घरात घुसून बलात्कार केल्याचा प्रयत्न, शिवसेना नेत्यावर गुन्हा दाखल

घरात घुसून बलात्कार केल्याचा प्रयत्न, शिवसेना नेत्यावर गुन्हा दाखल

एका महिलेने शिवसेनेचे नेते कुलदीप पंडित यांच्याविरोधात बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आरोप लगावला आहे.

  • Share this:

बागपत(उत्तर प्रदेश), 06 नोव्हेंबर :  शिवसेनेच्या एका नेत्याविरोधात बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आरोप लगावण्यात आला आहे. उत्तर प्रदेशमधील बागपत गावातील एका महिलेने शिवसेनेचे नेते कुलदीप पंडित यांच्याविरोधात बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आरोप लगावला आहे. त्याविरोधात महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तक्रारीनुसार पुढील तपास करण्यास सुरुवात केली आहे. या सगळ्या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेली माहितीनुसार, आरोपी कुलदीप पंडित हे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत. राज्यपाल कोतवाली प्रभारी अरविंद कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोतवाली परिसरातील एका गावातील 23 वर्षीय महिलेने कुलदीप पंडित यांच्यावर बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.

इतर बातम्या- 'शिवसेनेचा मुख्यमंत्री बसल्याशिवाय उद्धव ठाकरे स्वस्थ बसणार नाहीत'

पतीच्या अनुपस्थितीत केला बलात्काराचा प्रयत्न

सिंह यांच्या म्हणण्यानुसार, सोमवारी रात्री नऊ वाजता पीडितेने तक्रार दाखल केली की, कुलदीप पंडित पतीच्या अनुपस्थितीत घरात शिरले आणि त्यांनी बलात्काराचा प्रयत्न केला. महिलेच्या म्हणण्यानुसार, जेव्हा तिच्या शेजारीच्या लोकांनी आरडा-ओरड केली तेव्हा कुलदीप तेथून पळून गेले. कुलदीप पंडितांवर फरार झाल्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस गुन्ह्याच्या आधारे आता पंडित यांचा कसून शोध घेत आहे.

इतर बातम्या - निकालानंतरची सगळ्यात मोठी बातमी, भाजप करणार उद्या सत्ता स्थापनेचा दावा!

दरम्यान, या प्रकरणात अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलीस पीडित महिलेच्या घरच्यांची आणि स्थानिकांची चौकशी करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. इतकंच नाही तर परिसरातील सीसीटीव्हीदेखील तपासण्यात येणार आहेत. या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे.

इतर बातम्या - इतर बातम्या - सुजय विखेंना सुरक्षा देणाऱ्या पोलीस वाहनाचा भीषण अपघात, 150 फूट दरीत कोसळली कार

First published: November 6, 2019, 6:51 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading