भारताच्या मोठ्या तेलविहिरीला आग; शेकडो मैलांवरून दिसतायत भयंकर ज्वाळा आणि धूर

भारताच्या मोठ्या तेलविहिरीला आग; शेकडो मैलांवरून दिसतायत भयंकर ज्वाळा आणि धूर

ऑइल इंडिया लिमिटेडच्या (OIL) तेलविहिरीत मोठा स्फोट झाल्यानंतर आता भयंकर आग लागली आहे.

  • Share this:

गुवाहाटी, 9 जून : देशातलं महत्त्वाचं खनिज तेल उत्पादक केंद्र असलेल्या आसाममधल्या (Assam) बघजन ऑइल इंडिया लिमिटेडच्या (OIL) तेलविहिरीत मोठा स्फोट झाल्यानंतर आता भयंकर आग लागली आहे. गेल्या 13 दिवसांपासून या तेलविहिरीत वायूगळती होत होती. त्यावर नियंत्रणाचे प्रयत्न सुरू होती. पण आता या वायूने पेट घेतला आहे आणि अनेक किलोमीटरपर्यंत धूर दिसत आहे.

आठवड्याभरापूर्वीपासून या तिनसुखिया जिल्ह्यातल्या बघजन (Baghjan Oil India Limited ) तेलविहिरीतून वायूगळती होत होती. OIL ही भारतातली दुसऱ्या क्रमांकाची मोठी तेल उत्पादक कंपनी आहे. OIL च्या बघजान इथल्या तेलक्षेत्रात 27 मेपासून इथून लीकेज असल्याची माहिती आहे. त्यावर नियंत्रण आणायचा प्रयत्न सुरू असतानाच या गॅसने पेट घेतला आहे. शेकडो मैलांवरूनही दिसून येईल एवढे प्रचंड धुराचे लोट या भागातून येत आहेत.

तेलविहिरीत वायूगळती होऊ लागल्याचं लक्षात येताच गेल्याच आठवड्यात इथून सर्व नागरिकांना आणि कामगारांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं. कारंजासारख्या उडणाऱ्या या खनित वायूने पेट घेऊ नये म्हणून NDRF चे जवान इथे तैनात होते. या वायूगळतीवर उपाय शोधायला परदेशातून तज्ज्ञांची टीमही इथे हजर झाली होती. पण आता या गॅसने पेट घेतल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली आहे.

कृत्रिम फुफ्फुसांवर कोरोनाला हरवलं; ECMO वर जगणारी देशातील पहिली कोरोना रुग्ण

ऑइल इंडिया लिमिटेडच्या सांगण्यानुसार 2 जून रोजी इथल्या तेलविहिरीत लिकेज झाल्याचं लक्षात आलं. या वायूगळतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सिंगापूरहून तज्ज्ञांचा ताफा आसाममध्ये दाखल झाला आहे. गेल्या 13 दिवसात इथल्या खनिज तेलाच्या उत्पादन क्षेत्रातून दुसऱ्यांदा अशा पद्धतीने स्फोटक वायू बाहेर येत आहे. धोका लक्षात घेऊन हजारो लोकांना यापूर्वीच सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.

संकलन, संपादन - अरुंधती

अन्य बातम्या

पालघर साधू हत्याकांड: CID चौकशीनंतर जंगलात गेलेला तरुण घरी परतलाच नाही

कोरोनामुळे शिवसेना नगरसेवकाचं निधन, ठाण्यातील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

निसर्ग चक्रीवादळानं होत्याचं नव्हतं केलं! शरद पवार थेट बांधावर, मदरशालाही भेट

First published: June 9, 2020, 3:18 PM IST

ताज्या बातम्या