मराठी बातम्या /बातम्या /देश /बागेश्वर धाममध्ये लग्नाची धामधूम, धीरेंद्र शास्त्रींनी वधुपक्षाला दिला 'हा' शब्द

बागेश्वर धाममध्ये लग्नाची धामधूम, धीरेंद्र शास्त्रींनी वधुपक्षाला दिला 'हा' शब्द

बागेश्वर धाममध्ये सध्या लग्नाची धामधूम सुरू आहे. लग्नाची तयारी स्वत: पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री पाहतआहेत. शहरातील लोक आणि बागेश्वर धाममधील भक्तसुद्धा लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी शहरात अक्षता वाटत आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

दिल्ली, 07 फेब्रुवारी : बागेश्वर धाममध्ये सध्या लग्नाची धामधूम सुरू आहे. पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री दर वर्षी त्यांच्या धाममध्ये सामूहिक विवाहाचे आयोजन करतात. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दूरवरून लोक आले आहेत. बागेश्वर सरकारने १२१ गरीब मुलींच्या लग्नाचा संकल्प केला आहे. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी बागेश्वर धाम सरकारसह त्यांचे भक्तही प्रयत्नशील आहेत.

सामूहिक विवाह सोहळा १८ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या निमित्ताने होणार आहे. बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींनी मुलींच्या कुटुंबियांना आजपासून मी मुलींचा वडील आहे असं सांगितलं आहे. तसंच त्यांच्या लग्नाची जबाबदारी माझी असून संसाराला लागणारं साहित्य बागेश्वर धामकडून दिलं जाईल असा शब्दही धीरेंद्र शास्त्रींनी दिला आहे.

लग्नाची तयारी स्वत: पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री पाहतआहेत. शहरातील लोक आणि बागेश्वर धाममधील भक्तसुद्धा लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी शहरात अक्षता वाटत आहेत. नुकतंच बागेश्वर सरकारने स्वत:च्या लग्नाबद्दलही मोठी घोषणा केली होती. मी लवकरच लग्न करेन असं ते म्हणाले होते.

हेही वाचा : प्रभू रामांच्या मूर्तीसाठी देशातील प्रसिद्ध चित्रकार करणार रेखाटन, जाणून घ्या कसे असेल स्वरुप

बागेश्वर धाममध्ये होणाऱ्या लग्नासाठी पंडित धीरेंद्र शास्त्रींनी भेटवस्तू आणि कपड्यांचे वितरण केले आहे. वधुला लहंगा तर नवरदेवाला शेरवानी दिली आहे. ज्या मुलींचे लग्न होणार आहे त्यांना भेटवस्तू दिल्या जातील. बागेश्वर महाराज म्हणाले होते की, गरीब मुलींचा विवाह लावून देण्याचं काम करत असल्याचा अभिमान आहे. एका वडिलांच्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण असतो मुलीचं लग्न. मी त्या आनंदातला लहानसा वाटा घेत आहे.

दरम्यान, ज्या मुलींचे लग्न बागेश्वर धाममध्ये होत आहे त्यांच्या कुटुंबियांना पंडित धीरेंद्र शास्त्रींनी सांगितले की, आजपासून मी या मुलींचा पिता आहे. मुलींच्या लग्नाची जबाबदारी बागेश्वर धामची आहे. वर पक्षाला आवाहन आहे की वरातीत येणाऱ्या लोकांमध्ये कुणीही दारू पिऊन येऊ नये. बागेश्वर धाममध्ये दारू पिऊन येण्यास मनाई आहे.

First published:

Tags: Madhya pradesh