S M L

बदलापूरच्या ट्रेकरचा उत्तराखंडमध्ये मृत्यू

वाटेतला शेवटचा टप्पा असलेल्या बारा सुपा भागात आल्यावर अचानक हर्षदला श्वसनाचा त्रास जाणवू लागला.

Sachin Salve | Updated On: Jun 16, 2018 05:18 PM IST

बदलापूरच्या ट्रेकरचा उत्तराखंडमध्ये मृत्यू

 

उत्तराखंड, 16 जून : बदलापूरच्या एका ट्रेकरचा उत्तराखंडमध्ये ट्रेकिंग करताना मृत्यू झाल्याची घटना समोर आलीये. हर्षद आपटे असं या ट्रेकरचं नाव शुक्रवारी उत्तराखंडच्या बारा सुपा भागात ही घटना घडली.

हर्षद हा बदलापूरच्या पूर्व भागातील गांधी चौकात राहणारा होता. ७ जून रोजी हर्षद त्याच्या ११ जणांच्या टीमसोबत उत्तराखंडला ट्रेकिंगसाठी गेला होता, ज्यात ४ जण बदलापुरचे, तर इतर ७ जण उर्वरित महाराष्ट्रातले होते. २ परदेशी ट्रेकर्सही या ट्रेकमध्ये त्यांच्यासोबत होते. ९ तारखेला या सगळ्यांनी ट्रेकिंगची सुरुवात केली.१५ जून रोजी ते ट्रेक संपवून बेस कॅम्पकडे परतत होते. मात्र वाटेतला शेवटचा टप्पा असलेल्या बारा सुपा भागात आल्यावर अचानक हर्षदला श्वसनाचा त्रास जाणवू लागला. ऑक्सिजनची कमतरता आणि श्वसनाचा त्रास यामुळं अत्यवस्थ झालेल्या हर्षदला तातडीनं खाली आणण्यात आलं, मात्र तोवर त्याचा मृत्यू झाला होता.

फ्रिजमध्ये नका ठेवू 'हे' 12 पदार्थ !

या घटनेची माहिती मिळताच हर्षदचे कुटुंबीय शुक्रवारी बदलापूरहून उत्तराखंडसाठी रवाना झाले असून ते उद्या उत्तराखंडला पोहोचतील. ३३ वर्षांचा हर्षद विवाहित असून त्याला ४ वर्षांची मुलगीही आहे. या अकस्मात घटनेमुळे त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हर्षद हा आपटे कुटुंबातील एकुलता मुलगा होता. बदलापूरच्या एमआयडीसी भागात त्यांच्या केमिकल फॅक्टरी आहेत. या फॅक्टरीचे काम हर्षद पाहत होता.

Loading...

बिग बाॅसच्या घरात राजेश श्रृंगारपुरे परत येतोय !

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 16, 2018 05:18 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close