बदायूं, 08 जानेवारी : महिलेवर सामूहिक बलात्कार आणि निर्घृण हत्या करणाऱ्या नराधमाला अखेर 48 तासांनी बेड्या ठोकण्यात यश मिळालं आहे. मुख्य आरोपी महंत सत्यनारायणला पोलिसांनी अखेर गजाआड केलं आहे. 6 जानेवारी रोजी 50 वर्षीय महिला मृत असवस्थेत सापडली होती. या महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला असून अत्यंत क्रूरपणे तिची हत्या करण्यात आल्याची माहिती मिळाली होती.
उत्तर प्रदेशच्या बदायूंमध्ये पोलिसांनी सामूहिक बलात्कार आणि निर्घृण हत्येप्रकरणी मुख्य आरोपी महंत सत्यनारायणला अटक केली आहे. तो दोन दिवस फरार होता. पोलिसांनी त्याच्यावर 50 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. महंत सत्यनाराय अनुयायांच्या घरात लपला होता. तिथून त्याच्या मुस्क्या पोलिसांनी आवळल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार प्रशांत यांनी दिली.
Uttar Pradesh Police have arrested the main accused in Budaun gangrape and murder case. He had a bounty of Rs 50,000 on his head.
— ANI UP (@ANINewsUP) January 8, 2021
काय आहे प्रकरण?
अघौती या गावात 6 जानेवारीला 50 वर्षीय अंगणवाडी सहाय्यक असलेल्या महिलेचा मृतदेह सापडला होता. या महिलेच्या गुप्तांगात रॉड खुपसला होता आणि महिलेचा डावा पाय, बरगडी मोडल्याचं शवविच्छेदन अहवलातून धक्कादायक माहिती देखील समोर आली होती. ही महिला मंदिरात पूजेला गेली असताना हा धक्कादायक प्रकार घडला होता. त्यानंतर गावात संतापाची लाट उसळली होती.
विरोधी पक्षांनीही योगी आदित्यनाथ सरकारला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आरोपींवर कठोर कारवाई कऱण्याचं आश्वासन दिलं आहे. या घटनेतील दोषींची कोणतीही गय केली जाणार नाही असं आश्वासन देखील त्यांनी दिलं आहे. या प्रकऱणी आता पोलिसांकडून मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Uttar pradesh