उत्तर प्रदेशात आंबेडकरांच्या भगव्या पुतळ्याला बसपा कार्यकर्त्यांनी लावला निळा रंग

उत्तर प्रदेशात आंबेडकरांच्या भगव्या पुतळ्याला बसपा कार्यकर्त्यांनी लावला निळा रंग

या घटनेमुळे भाजपवर हिंदुत्ववादी अजेंडा राबवण्याचा आरोप होऊ लागलाय. या प्रकाराबद्दल आंबेडकरी अनुयायांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय.

  • Share this:

दुगरैया,10 एप्रिल : उत्तर प्रदेशात आंबेडकरांच्या नाव बदलाच्या वादानंतर आता भगव्या पुतळ्याचाही वाद समोर आलाय. बदाऊनमधल्या दुगरैय्या गावात हा प्रकार समोर आलाय, त्याचं झालं असं की, या गावातील डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने तिथं बाबासाहेबांचा चक्क भगव्या रंगातला पुतळा बसवला होता. ही बाब समोर येताच बसपाच्या कार्यकर्त्यांनी याच पुतळ्याला पुन्हा निळा रंग दिलाय.

पण या घटनेमुळे भाजपवर हिंदुत्ववादी अजेंडा राबवण्याचा आरोप होऊ लागलाय. या प्रकाराबद्दल आंबेडकरी अनुयायांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 10, 2018 01:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading