Home /News /national /

5 वर्षांपूर्वी लॅपटॉपमध्ये घेतला मित्राच्या मोबाइलचा बॅकअप; लॉकडाऊनमध्ये पैसे कमविण्यासाठी असा वापर

5 वर्षांपूर्वी लॅपटॉपमध्ये घेतला मित्राच्या मोबाइलचा बॅकअप; लॉकडाऊनमध्ये पैसे कमविण्यासाठी असा वापर

त्यानंतर आता तरुणाची पोलीस ठाण्यात रवानगी करण्यात आली..काय आहे हा प्रकार?

    नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर : कोरोनामुळे (Corona) झालेल्या लॉकडाऊननंतर (Lockdown) बरेच लोक बेरोजगार झाले. अशा परिस्थितीत बर्‍याच लोकांनी गुन्हे करून पैसे कमविण्यास सुरुवात केली. अशीच एक घटना राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यातील बनड पोलीस ठाण्याच्या हद्दीत नोंदविण्यात आली आहे. येथे एका महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. एक तरुण तिला मोबाइलवरून कॉल करतो आणि हा तरुण तिचे फोटो व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवतो. इतकचं नाही तर आरोपी युवकाने महिलेला फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. यासाठी त्याने तिच्याकडे 3.50 लाख रुपयांची मागणी केली आहे. यानंतर घाबरलेल्या महिलेने पोलीस ठाणं गाठलं आणि आरोपी युवकावर गुन्हा दाखल केला आहे. बनाड पोलीस अधिकारी अशोक अंजना यांनी सांगितलं की, गेल्या काही दिवसांपासून एका महिलेचे वैयक्तिक फोटो व्हायरल करण्याच्या नावाखाली तिला फोन करून ब्लॅकमेल करत असल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे. तरूण त्या महिलेला ब्लॅकमेल करीत तिच्याकडून बदल्यात साडेतीन लाख रुपयांची मागणी करत आहे. हे ही वाचा-...तर 20 लाख मुलांचा होऊ शकतो मृत्यू; कोरोनाच्या संकटात Unicef चा इशारा त्याचवेळी या युवकाने पैसे न दिल्याबद्दल फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. महिलेच्या तक्रारीनुसार  पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्वरित कारवाई केली आणि आरोपीला ताब्यात घेतले. पोलीस चौकशीत आरोपीने सांगितले की, त्याने महिलेचा फोटो पतीच्या मोबाइलवरून घेतला होता. लॉकडाऊनपासून आरोपी आर्थिक संकटातून जात होता. यासाठी त्याने पैशांसाठी महिलेला ब्लॅकमेल करण्याचं ठरवलं. हे ही वाचा-कोरोनाची लस तर तयार होईल, मात्र पुढील व्यवस्था सर्वात कठीण; तज्ज्ञ चिंतेत त्याचवेळी पोलीस अधिकारी अशोक अंजना यांनी सांगितलं की, चौकशी दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार पीडितेचा नवरा आणि आरोपी पूर्वी एकत्र काम करायचे. त्याच वेळी म्हणजे सुमारे 5 वर्षांपूर्वी त्याने पीडितेच्या पतीच्या मोबाइलचा त्याच्या लॅपटॉपमध्ये बॅकअप घेतला होता. त्या फोटोंचा वापर त्याने चुकीच्या मार्गाने पैसे कमवण्यासाठी केला. पोलीस सध्या आरोपीची चौकशी करत आहेत.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona, Lockdown

    पुढील बातम्या