सुकमा, 28 डिसेंबर : बचपन का प्यार (Bachpan ka pyar) गाण्यामुळे रातोरात स्टार झालेला सहदेव दिरदोचा अपघात (Sahdev dirdo accident) झाला आहे. छत्तीसगडमध्ये (chhattisgarh) बाईक अपघातात सहदेव गंभीर जखमी झाला आहे (Bachpan ka pyar fame sahdev dirdo accident). त्याच्या डोक्याला दुखापत झाली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते आहे.
बचपन का प्यार गाण्यामुळे छत्तीसगडच्या सुकमामध्ये (sukma) राहणारा सहदेव प्रसिद्ध झाला होता. या गाण्यामुळे तो खूप चर्चेत आला होता. आता त्याचा अपघात झाल्याची बातमी मिळते आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिथं त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी संध्याकाळी पाच वाजता हा अपघात झाला. सहदेव आपल्या मित्रांसोबत टू व्हीलवर शबरी नगरकडे जात होता. तेव्हा अचानक बाईकवरील नियंत्रण सुटलं आणि बाईक पलटी झाली. अपघातात सहदेवच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.
तिथं असलेल्या नागरिकांनी त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. तिथून त्याला आता जगदलपूरमधील रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे.
हे वाचा - VIDEO-दोन्ही हातपाय नाही तरी सुसाट चालवतो गाडी; दिव्यांगाच्या जिद्दीला सलाम कराल
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये एक छोटासा मुलगा ‘बसपन का प्यार’ हे गाणं म्हणताना दिसून येतं होता. हा एक शाळकरी मुलगा होता. व्हिडीओमध्ये तो एका शाळेत असल्याचं दिसत होतं. हा मुलगा म्हणजेच सहदेव दिरदो होय. त्याच्या त्या निरागस गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. सर्व कलाकार आवर्जून या व्हिडीओवर रील करताना दिसले होते. सोशल मीडियावर ‘बसपन का प्यार’ या गाण्याचा ट्रेंडचं सुरू झाला होता.
हे वाचा - आश्चर्यच! याला कोकरू म्हणावं की बाळ? बकरीच्या पोटी जन्माला आलं माणसासारखं पिल्लू
या व्हिडीओची दखल घेत. बॉलिवूड गायक बादशाहने आस्था गिलसोबत मिळून आणि सहदेवला घेऊन हे गाणं रेकॉर्ड केलं आणि आता हे गाणं जोरदार हिट ठरत आहे. या गाण्यामुळे सहदेव दिरदोचं आयुष्यचं बदलून गेलं आहे. सहदेव इतका फेमस झाला की आत्ता अनेक पापाराझी त्याला आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी त्याच्या मागावर असतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Accident, Chattisgarh