Home /News /national /

शेतकऱ्यांच्या आंदोलनात पोहोचले ठाकरे सरकारचे मंत्री, रस्त्यावर झोपून काढली रात्र!

शेतकऱ्यांच्या आंदोलनात पोहोचले ठाकरे सरकारचे मंत्री, रस्त्यावर झोपून काढली रात्र!

दिल्लीच्या चारही दिशेने प्रचंड शेतकऱ्यांच आंदोलन सुरू असून दिल्लीमध्ये प्रवेश करणे कठीण झाले आहे.

नवी दिल्ली, 11 डिसेंबर : कृषी कायद्याविरोधात (agriculture act 2020) दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी आंदोलन (farmers protest) पुकारले आहे. देशभरातून या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचा पहिला नेता दिल्लीत पोहोचला आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास करून राज्यमंत्री बच्चू कडू (bacchu kadu) दिल्ली सीमेवरवर अखेर पोहोचले आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्य मंत्री बच्चू कडू यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह दिल्लीकडे कूच केली होती.  गुरुवारी रात्री बच्चू कडू यांना हरियाणा उत्तर प्रदेशच्या बॉर्डरवर पोलिसांनी रोखले होते. मात्र, बच्चू कडू चाळीस ते पन्नास निवडक कार्यकर्त्यांसह दुचाकी वाहनाने बॉर्डरच्या दिशेने निघाले. दिल्ली बॉर्डरवर पलवाल येथे पोहोचले. कडू यांनी कार्यकर्त्यांसह रात्र पलवाल बॉर्डरवर रस्त्यावर झोपून काढली आणि आज सकाळी मुख्य आंदोलनस्थळी पोहोचणार आहेत. मनीष सिसोदिया यांच्या घरावर भाजप कार्यकर्त्यांचा हल्ला, स्वत: शेअर केला VIDEO दिल्लीच्या चारही दिशेने प्रचंड शेतकऱ्यांच आंदोलन सुरू असून दिल्लीमध्ये प्रवेश करणे कठीण झाले आहे. ज्या ठिकाणी बच्चू कडू यांनी रस्त्यावर झोपून रात्र घालवली त्याठिकाणी चारशे ते पाचशे ट्रॅक्टरचा ताफा लागलेला आहे. मोठ्या प्रमाणात शेतकरी सुद्धा या ठिकाणी आंदोलन करत आहे. आज बच्चू कडू हे कार्यकर्त्यांसह मुख्य आंदोलनस्थळी पोहोचणार आहेत. फक्त पार्थिव पटेल नाही तर या 5 क्रिकेटपटूंच्या करिअरला MS धोनीमुळे लागला ब्रेक बुधवारी  ग्वालियर  येथून भरतपूर मार्गे पलवलला जाण्यासाठी बच्चू कडू यांच्या वाहनांचा ताफा निघाला होता. मात्र, राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवरील धौलपूरला येताच  उत्तर प्रदेश पोलिसांनी वाहनांचा ताफा रोखला. पुढे आग्रा व इतर भागात चक्का जाम असल्याचे युपी पोलिसांनी कारण पुढे केल्याने पर्यायी भरतपूर मार्गे ताफा नेण्यास सांगितले. परंतु, भरतपूरपासून पुढचे सगळे मार्ग युपी पोलिसांनी स्वतःहून बंद केल्याने गुरूद्वारात मुक्काम करावा लागला होता.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या