Home /News /national /

महिला मंत्र्याचा थाट, कर्मचाऱ्याला सांगितले शूजचे डिस्पोजेबल कव्हर काढायला; विरोधकांनी शेअर केला Video

महिला मंत्र्याचा थाट, कर्मचाऱ्याला सांगितले शूजचे डिस्पोजेबल कव्हर काढायला; विरोधकांनी शेअर केला Video

राष्ट्रीय लोक दल (RLD) ने उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) कॅबिनेट मंत्री बेबी राणी मौर्य (Cabinet Minister Baby Rani Maurya) यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

    उत्तर प्रदेश, 14 मे: राष्ट्रीय लोक दल (RLD) ने उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) कॅबिनेट मंत्री बेबी राणी मौर्य (Cabinet Minister Baby Rani Maurya) यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात त्यांच्यावर कर्मचार्‍यांकडून बुटांची डिस्पोजल काढण्याचा आरोप करण्यात आला आहे. आरएलडीने आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की, सत्तेच्या नशेत असलेल्या बेबी राणी मौर्य यांच्याकडे पहा, त्यांनी कर्मचाऱ्याकडून स्वतःच्या बूटांचं डिस्पोजेबल कव्हर काढून घेतलं. RLD ने लिहिलं, 'बेबी राणी मौर्यचे थाट पहा सत्तेच्या नशेत असलेल्या मॅडम, उन्नावमधील पोषण उत्पादन युनिटची तपासणी केल्यानंतर, तिथल्या कर्मचाऱ्याकडून स्वतःच्या चपलांचे डिस्पोजेबल कव्हर्स काढून घेतले. मोठी बातमी: चीन करतोय बॅलेस्टिक मिसाईलची चाचणी, Satellite Image आली समोर बेबी राणी मौर्य शुक्रवारी उन्नावच्या बिघापूर ब्लॉकच्या घाटमपूर गावात अन्न प्रसन्न प्रेरणा महिला लघु उद्योग पोषण युनिटमध्ये पोहोचल्या होत्या. येथे त्यांनी युनिटची पाहणी केली. कॅबिनेट मंत्र्यांनी गरोदर महिला आणि कुपोषित बालकांसाठी तयार केलेल्या पोषण आहाराची गुणवत्ता तपासली. येथे गहू सडत असल्याचे मंत्र्यांच्या लक्षात आले, त्यावर नाराजी व्यक्त करत जबाबदार अधिकाऱ्याकडून खुलासा मागवला आहे. दर्जेदार पोषण आहार देण्याच्या सक्त सूचना मंत्र्यांनी दिल्या. सपा नेही साधला निशाणा यावरून समाजवादी पक्षानंही त्यांच्यावर निशाणा साधला. सत्तेच्या नशेत राज्यकर्ते गर्विष्ठ झाले आहेत, असे सपाने ट्विटरवर लिहिलं आहे. उन्नावमधील अन्नुपूर पोषण उत्पादन युनिटची पाहणी केल्यानंतर कॅबिनेट मंत्री बेबी राणी मौर्य यांनी त्यांच्या शूजचे डिस्पोजेबल कव्हर तेथे उपस्थित कर्मचाऱ्यांकडून काढून घेतले. मंत्री महोदय, तुमच्या या कृत्याबद्दल तुम्ही माफी मागावी, असं सपानं म्हटलं आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Uttar pradesh news, Video viral

    पुढील बातम्या