'बाळा, मी मरतेय रे..'; मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या आईचं हृदय पिळवटून टाकणारं पत्र

'बाळा, मी मरतेय रे..'; मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या आईचं हृदय पिळवटून टाकणारं पत्र

या आईने केलेलं एक ट्वीट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ते ट्वीट वाचून कोणाचंही हृदय पिळवटून निघेल.

  • Share this:

कॅनडाच्या (Canada) न्यूरोसायंटिस्ट (neuroscientist) डॉ. नादिया चौधरी (Dr Nadia Chaudhri) यांनी अनुग्रह, आत्म-नियंत्रण आणि शक्तीची व्याख्या बदलली आहे. त्यांनी केलेलं एक ट्वीट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ते ट्वीट वाचून कोणाचंही हृदय पिळवटून निघेल. डॉ. चौधरी यांना जून 2020 मध्ये advanced ovarian cancer झाल्याचं कळलं होतं. त्यानंतर आता त्यांनी सोशल मीडियावर कॅन्सरसोबतचं युद्ध लढण्याचा आपला अनुभव शेअर केला आहे. डॉ. चौधरी यांनी आपल्या मुलाला सांगितलं की, ती कर्करोगापासून आपलं युद्ध हरणार आहे.

ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, आजच्या दिवशी मी माझ्या मुलाला सांगत आहे की, मी कॅन्सरने मरत आहे. आज ती वेळ आली आहे, जेव्हा मला हे सत्य सांगांव लागेल. माझे अश्रू आता वाहूदेत, त्यामुळे मी अधिक कणखर होईन.

हे ही वाचा-ICU बेड न मिळूनही कोरोनाशी लढा देतेय ही तरुणी, डॉक्टरांनीच शेअर केला VIDEO

त्यांनी मुलासोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. त्यांच्या फॉलोअर्सना याबाबत ऐकून खूप वाईट वाटलं. फॉलोअप ट्वीटमध्ये डॉ. चौधरी यांनी त्यांच्या मुलाने काय प्रतिक्रिया दिली, याबाबतचा अनुभवही शेअर केला आहे. त्यांनी लिहिलं आहे की, या गोष्टीमुळे आम्हाला धक्काच बसला आहे. आम्ही खूप रडलो. त्यानंतर उपचार सुरू झाला. माझा मुलगा धाडसी आहे. तो ठीक होईल याचा विश्वास आहे. आणि मी जेथे कुठे असेन तेथून त्याला मोठं होताना पाहेन. आजचा दिवस माझ्यासाठी खूप अवघड होता, तुम्हा सर्वांच्या प्रेमासाठी धन्यवाद.

Published by: Meenal Gangurde
First published: May 13, 2021, 7:15 PM IST

ताज्या बातम्या