12 सिंहांनी घेरलेल्या रुग्णवाहिकेत महिलेनं दिला बाळाला जन्म

12 सिंहांनी घेरलेल्या रुग्णवाहिकेत महिलेनं दिला बाळाला जन्म

तब्बल 25 मिनिटं 12 सिंहांनी या रुग्णवाहिकेला गराडा घातला होता त्याच परिस्थितीत महिलेला प्रसुती झाली.

  • Share this:

02 जुलै : गर्भवतीला प्रसुतीसाठी रुग्णालयात नेणाऱ्या रुग्णवाहिकेला सिंहांच्या कळपाने गराडा घातल्याची थरारक घटना गुजरातमध्ये घडलीये. तब्बल 25 मिनिटं 12 सिंहांनी या रुग्णवाहिकेला गराडा घातला होता त्याच परिस्थितीत महिलेला प्रसुती झाली.

गुजरातमधील जाफराबाद तालुक्यातील लुंसापूर गावात राहणारी मंदूबेना मकवाना नावाच्या गर्भवती महिलेला 29 जूनच्या मध्यरात्री रोजी प्रसुतीवेदना सुरू झाल्या. रुग्णालयात नेण्यासाठी तातडीने रुग्णवाहिका बोलवण्यात आलीय. रुग्णवाहिकेनं जात असताना रस्त्यात गिर जंगलाचा मार्ग लागतो. जेव्हा गाडी जंगलात पोहचली तेव्हा रस्त्यावर एक नाही दोन नाही तर तब्बल 12 सिंहाचा कळप रस्त्याच्या मधोमधो उभा ठाकला. सिंहांनी रुग्णवाहिकेकडे मोर्चावळवला आणि गराडा घातला.

सिंहांनी गराडा घातल्यामुळे 'इकडे आड तिकडे विहीर' अशी परिस्थिती निर्माण झाली.  खबरदारी म्हणून ड्राॅयव्हरने गाडी पुढे न नेण्याचा निर्णय घेतला. पण दुसरीकडे मंगूबेनला प्रसुतीवेदना वाढत होत्यात. सिंहांचा कळप आता जाईल तेव्हा जाईल म्हणून  वाट पाहिली. पण सिंहांच्या कळप काही हटला नाही. तब्बल 25 मिनिटं हा थरार सुरू होता. अखेर डाॅक्टरच्या सल्ल्याने रुग्णवाहिकेतच या महिलेची प्रसुती करण्याचा निर्णय घेण्यात आला. तिने सुंदर अशा मुलाला जन्म दिला. जन्मानंतर त्याला वाॅर्मरमध्ये ठेवण्यात आलं. विशेष म्हणजे, बाळाच्या जन्मानंतर सिंहांनी रुग्णवाहिकेला घातलेला गराडा सोडला. त्यानंतर ड्रायव्हरने कमी वेगात गाडी तेथून काढली आणि थेट हाॅस्पिटलच्या दारात उभी केली.  डाॅक्टरांनी तपासणी करून  बाळ-बाळंतीणी सुखरूप असल्याचं सांगितलं.

First published: July 2, 2017, 3:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading