S M L

रामजन्मभूमीची पुढची सुनावणी 14 मार्चला

सरन्यायाधीश दिपक मिश्रा,न्यायमुर्ती एस अब्दुल नाझीर आणि न्यायमुर्ती अशोक भूषण या खटल्यावर सुनावणी करत आहेत.

Chittatosh Khandekar | Updated On: Feb 8, 2018 03:45 PM IST

रामजन्मभूमीची पुढची सुनावणी 14 मार्चला

  दिल्ली , 08 फेब्रुवारी:    देशातला सगळ्यात वादग्रस्त आणि जुना खटला असलेल्या रामजन्भूमीची सुनावणी सुप्रीम कोर्टात आज सुरू होईल. आता पुढची सुनावणी 14 मार्चला होणार आहे.

रामजन्मभूमीचा मुद्दा  हा अत्यंत जुना मुद्दा आहे. उत्तर प्रदेशमधील अयोध्या शहरात बाबरी मस्जिदही मुळच्या रामजन्मभूमीवर उभारला गेल्याचा हिंदू संघटनांचा  आणि निर्मोही आखाड्याचा मुद्दाअसून ही जमीन  पूर्वापार  मशिद आणि कबरीस्तानाचीच असल्याचं वक्फ बोर्ड आणि ऑल इंडिया पर्सनल मुस्लिम लॉ बोर्डाचं म्हणणं आहे.

अलाहबाद हायकोर्टाच्या निर्णयानंतर आता हा खटला सुप्रीम कोर्टात गेला आहे. आज या प्रकरणी झालेल्या पहिल्या सुनावणीत कोर्टात वेगवेगळे पुरावे सादर करण्यात आले. पण हे सगळे पुरावे पुरातन संस्कृत, पाली,फारसी या भाषांमध्ये असल्यामुळे त्यांंचं भाषांतर करून ते सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला दिले आहेत.

हा खटला पूर्णत: वादग्रस्त जमिनीभोवतीच फिरणार आहे,. बाबरी मस्जिदचा पाडाव दंगली या कुठल्याच विषयावर हा चर्चा करणार नाही. सरन्यायाधीश दिपक मिश्रा,न्यायमुर्ती एस अब्दुल नाझीर आणि न्यायमुर्ती अशोक भूषण या खटल्यावर सुनावणी करत आहेत.

कपिल सिब्बल ही मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाची बाजू मांडत आहेत तर हरीश साळवे पासून अनेक दिग्गज वकील हिंदु संघटना  आणि निर्मोही आखाड्याची बाजू मांडत आहेत.

Loading...
Loading...

या खटल्याच्या निकालाकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 8, 2018 03:42 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close