Elec-widget

बाबरी मशिदीचे पक्षकार इक्बाल अन्सारी जमीन घ्यायला तयार, सरकारकडे करणार ही मागणी

बाबरी मशिदीचे पक्षकार इक्बाल अन्सारी जमीन घ्यायला तयार, सरकारकडे करणार ही मागणी

अयोध्या प्रकरणी निकाल देताना सुप्रीम कोर्टाने बाबरी मशिदीच्या पक्षकारांना पर्यायी 5 एकर जमीन देण्याचे आदेश दिले. बाबरी मशिदीसाठी लढणारे इक्बाल अन्सारी यांनी याबद्दल आता एक मोठं विधान केलं आहे.

  • Share this:

अयोध्या, 12 नोव्हेंबर : अयोध्या प्रकरणी निकाल देताना सुप्रीम कोर्टाने बाबरी मशिदीच्या पक्षकारांना पर्यायी 5 एकर जमीन देण्याचे आदेश दिले. बाबरी मशिदीसाठी लढणारे इक्बाल अन्सारी यांनी याबद्दल आता एक मोठं विधान केलं आहे. सरकारने जर आम्हाला जमीन दिली तर तिथे शाळा आणि हॉस्पिटल बांधू, असं इक्बाल अन्सारी यांनी म्हटलं आहे. कोर्टाच्या निकालानंतर हिंदू आणि मुस्लिमांमधली तेढ संपली आहे, असंही ते म्हणाले.

याआधी, मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड आणि सुन्नी वक्फ बोर्डाने ही जमीन घ्यायला नकार दिलाय. एमआयएमचे नेते असादुद्दीन ओवेसी यांनीही, आम्हाला या जमिनीची भीक नको आहे, असं वक्तव्य केलं होतं.

इक्बाल अन्सारी यांनी न्यूज 18 शी खास बातचीत केली. कोर्टाने जो निकाल दिलाय त्याचा आम्ही सन्मान करतो, कोर्टाने मशिदीसाठी जमीन दिली आहे. जर आम्हाला बोलवण्यात आलं तर आम्ही याबद्दलची रणनीती ठरवू, असं त्यांनी सांगितलं.

(हेही वाचा : एका फोन कॉलमुळे शिवसेना सत्तेपासून राहिली लांब)

इक्बाल अन्सारी म्हणाले, आम्हाला या मशिदीच्या जाग मदरसा बांधून द्यावा, अशी आम्ही सरकारकडे मागणी करू.

Loading...

मुस्लिमांना दिली जाणारी जमीन सरकारने घेतलेल्या 67 एकर जमिनीमधूनच दिली जावी, अशी मागणीही इक्बाल अन्सारी यांनी केलीय. केंद्र सरकारने 1991 मध्ये अयोध्येतल्या वादग्रस्त ठिकाणासह 67 एकर जमीन संपादित केली होती. या जमिनीतूनच 5 एकर जमीन द्यावी. या जागेपासून काही अंतरावर मशिदीसाठी जागा दिली तर ते योग्य ठरणार नाही, असंही इक्बाल अन्सारी यांनी सांगितलं.

=====================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 12, 2019 04:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com