S M L

बाबरी विध्वंस प्रकरणी अडवाणींसह 12 जणांवर खटला चालणार

सुप्रीम कोर्टाने कल्याणसिंह यांना दिलासा दिला आहे.

Samruddha Bhambure | Updated On: Apr 19, 2017 12:09 PM IST

बाबरी विध्वंस प्रकरणी अडवाणींसह 12 जणांवर खटला चालणार

19 एप्रिल : बाबरी विध्वंस प्रकरणी सुप्रीम कोर्टानं आज महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासह 13 नेत्यांवर गुन्हेगारी कट रचल्याचा खटला चालवण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

अयोध्येतील वादग्रस्त वास्तू पाडल्याप्रकरणी सीबीआयच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी सुप्रीम कोर्टाने लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासह 13 जणांवर वादग्रस्त वास्तू पाडण्यासाठी कट रचल्याचा खटला  चालवण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती पीसी घोष आणि न्यायमूर्ती रोहिंटन नरीमन यांच्या खंडपीठाने सीबीआयच्या याचिकेवर हा निकाल दिला आहे.

सुप्रीम कोर्टाने हा खटल्याची सुनावणी दोन वर्षात पूर्ण करण्याचा आदेशही सुप्रीम कोर्टाने दिला आहे. याशिवाय, कारसेवकांविरोधात लखनौ कोर्टात आणि व्हीव्हीआयपींविरोधात रायबरेली कोर्टात सुरू असलेल्या खटल्यांची लखनौ कोर्टातच एकत्रित सुनावणी घेण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने यावेळी दिले आहेत.  त्याचबरोबर, जो पर्यंत निकाल लागत नाही तो पर्यंत खटल्याची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांची बदली करता येणार नाही, असंही कोर्टाने आपल्या आदेशात म्हटलं आहे.

तर, सुप्रीम कोर्टाने कल्याणसिंह यांना दिलासा दिला आहे. कल्याणसिंह हे सध्या राजस्थानमधील राज्यपाल असून ते या पदावर असेपर्यंत त्यांच्यावर खटला चालवता येणार नाही असे कोर्टाने नमूद केले.

6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येत बाबरी मशीद पाडण्यात आली  होती. या प्रकरणी  आडवाणी, जोशी, उमा भारतींवर चिथावणीखोर भाषणे केल्याचा आरोप सीबीआयने केला होता. 2010 मध्ये अलाहाबाद हाय कोर्टाने या नेत्यांवरुन बाबरी मशीद प्रकरणी गुन्हेगारी कारस्थान रचल्याचा  आरोप हटवला होता. त्यानंतर, हाय कोर्टाच्या या निर्णयाला सीबीआयने सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं.

Loading...
Loading...

काय आहे प्रकरण?

 • 6 डिसेंबर 1992 ला अयोध्येतली बाबरी मशिद पाडली
 • बाबरी पाडल्यानंतर भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसह 14 जणांवर गुन्हा दाखल करण्याची सीबीआयीची मागणी
 • बाबरी पाडल्यानंतर 2 एफआयआर दाखल केले, लखनौ आणि फैजाबादमध्ये
 • फैजाबादचा खटला रायबरेलीकडे वर्ग केला त्यात 8 भाजप नेत्यांवर प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप
 • आरोपी : अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती अशा नेत्यांचा समावेश
 • भाजप नेत्यांनी कट रचल्याचा सीबीआयचा दावा, पुरावेही, आरोपपत्रही दाखल
 • काही काळानंतर बाळासाहेब ठाकरेंसह 13 जणांवरही आरोपपत्र दाखल
 • बाबरी पाडल्या प्रकरणी 21 जणांवर आरोपपत्र दाखल
 • आता अडवाणींसह 12 जणांवर बाबरी पाडल्या प्रकरणी खटला चालणार

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं महत्त्व काय?

 • अडवाणी, जोशी, उमा भारती यांच्यावर आता खटला चालणार, राजकीयदृष्ट्या भाजपची अडचण
 • अडवाणींवर खटला चालणार त्यामुळे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून त्यांची अडचण
 • उमा भारती ह्या सध्या मोदी मंत्रिमंडळात मंत्री, त्यांच्यावरही खटल्यामुळे टांगती तलवार
 • खटल्याचा निकाल दोन वर्षात लागणार तोपर्यंत अडवाणींचं राजकीय भवितव्यही टांगणीला
 • मुरली मनोहर जोशींचं राजकीय भवितव्यही टांगणीला, सध्या फक्त खासदार
 • जोशी, उमा भारती हे अडवाणी कँपचे मानले जातात आता त्यांना मोदींना विरोध करणं अवघड
 • भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांवरच रोज सुनावणी होणार त्यामुळे काँग्रेससह विरोधकांना आयतं कोलीत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 19, 2017 12:09 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close