नवी दिल्ली 24 जुलै: वादग्रस्त बाबरी मशिद पाडल्याप्रकरणी (Babri Demolition Case) माजी केंद्रीय गृहमंत्री लालकृष्ण अडवानी (Lal Krishna Advani) यांची साक्ष आज नोंदविण्यात आली. सीबीआयच्या विशेष कोर्टात त्यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आपला जबाब नोंदवला. या प्रकरणात केवळ राजकीय हेतूने आपल्याला गोवण्यात आलं आहे. तत्कालीन केंद्र सरकारच्या इशाऱ्यावरूनच हे काम करण्यात आलं असून आपण निर्दोष आहोत असंही त्यांनी सांगितलं.
अडवानी म्हणाले, मी त्यावेळी उपस्थित नव्हतो. मला नाहक या प्रकरणात अटकविण्यात आलं आहे. या आधी गुरुवारी माजी केंद्रीय मंत्री मुरली मनोहर जोशी यांचाही जबाब नोंदविण्यात आली होता. हे सर्व प्रकरण राजकीय हेतूने प्रेरित आहे असंही ते म्हणाले.
सीबीआयचे सर्व आरोपही त्यांनी फेटाळून लावले होते. जी व्हिडीओ कॅसेट कोर्टात सादर करण्यात आली होती. त्यात छेडछाड करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
या प्रकरणी जोशींना तब्बल 1050 प्रश्न विचारण्यात आले होते. सकाळी 11 वाजता सुरु झालेली प्रश्नोत्तरं दुपारी 3:30वाजेपर्यंत चालले होते. आत्तापर्यंत 29 आरोपींनी आपली साक्ष नोंदवली आहे.
गेली अनेक वर्ष या खटल्याचं कामकाज सुरू आहे. आता राम मंदिराच्या खटल्याचा निकाल लागून त्यावर 5 ऑगस्टला मंदिराचं कामकाजही सुरु होणार असून हा खटला मात्र अनेक वर्ष रेंगाळला आहे.
येत्या 5 ऑगस्टला मंदिराचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते होणार आहे. ‘राम मंदिर निर्माण तीर्थ ट्रस्ट’ची (Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra Trust) बैठक झाली आणि त्यात पंतप्रधानांना निमंत्रण देण्यात आलं. पंतप्रधानांनी ते निमंत्रण स्वीकारलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या संदर्भातला आढावा घ्यायलाही सुरुवात केली आहे.
Make in India: भारतात Appleने सुरु केलं iPhone 11चं उत्पादन, चीनला धक्का
श्रावण महिना हा पवित्र समजला जातो. याच महिन्यात भूमिपूजन व्हावं असा ट्रस्टचा प्रयत्न होता. पंतप्रधानांच्या हस्तेच भूमिपूजन व्हावं अशी ट्रस्टच्या सगळ्यांचीच इच्छा होती.
Corona चा मृत्यूदर आपल्याकडे कमी; भारतातल्या गर्दीनेच वाढली प्रतिकारशक्ती
देशातल्या सर्व नागरिकांचा या बांधकामात सहभाग असावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत अशी माहिती ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी दिली. मंदिरासाठी पैसे कमी पडले नाहीत आणि पडणारही नाहीत असंही राय यांनी सांगितलं होतं.