नवी दिल्ली 28 मे: कोरोना व्हायरसवर औषध शोधण्यासाठी जगभरच्या कंपन्या संशोधन करत आहेत. यात जगातल्या दिग्गज औषध निर्मात्या कंपन्यांचा समावेश आहे. अमेरिकेसहीत अनेक बडे देश यात सहभागी आहेत. विज्ञानातल्या सगळ्या आधुनिक उपकरणांचा आणि ज्ञानाचा त्यासाठी वापर केला जात आहे. प्राचीन भारतीय परंपरेचं महत्त्वाचं अंग असलेल्या आयुर्वेदाने कोरोना व्हायरसचा खात्मा करण्यासाठी आता ‘पतंजली’ने पुढाकार घेतला आहे. कोरोना औषधांच्या क्लिनिकल ट्रायल्स सुरू करणार असल्याचं ‘पतंजली’चे आचार्य बालकृष्ण यांनी सांगितलं आहे.
शुद्ध आयुर्वेच्या माध्यमातून यावर औषध शोधलं जाणार असून त्यासाठी शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. या संशोधनासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळाल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
बालकृष्ण म्हणाले, या ट्रायलसाठी CTRI (Clinical Trials Regulator of India) ने परवानगी दिली आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यांपासून आम्ही कोरोनावर उपचार करत आहोत. मात्र आता पुराव्यानिशी आणि सगळी नोंद ठेवून हे संशोधन केलं जाणार आहे. जयपूर आणि इंदूर इथं हे संशोधन सुरू आहे. पतंजलीच्या तीन अत्याधुनिक लॅब असून त्यात 500 संशोधक काम करत आहेत. त्यातले 100 जण हे डॉक्टरेट झाल्यानंतरही संशोधन करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
6 फुटापर्यंतचे सोशल डिस्टन्सिंग पुरेसं नाही! अभ्यासातून आली महत्त्वपूर्ण माहिती
या तीनपैकी एक लॅब ही पूर्णपणे कोव्हिड19 वर संशोधन करत आहे. पतंजलीने विविध 100 आयुर्वेदीक वनस्पतिंची निवड करून त्यापासून 1 हजार प्रकारचे अर्क बनवून त्याची तपासणी केली असल्याची माहितीही बालकुष्णन यांनी दिली.
कृपया लहान मुलांना मास्क घालू नका; आरोग्य तज्ज्ञांनी पालकांना का दिला असा सल्ला?
8 हजार 500 कोटींची उलाढाल असलेल्या पतंजलीने आयुर्वेदीक उत्पादनांमध्ये जगभर आपला ठसा उमटवला आहे.
Published by:Priyanka Gawde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.