लोकसंख्या नियंत्रणासाठी बाबा रामदेवांनी सांगितला नवीन उपाय

लोकसंख्या नियंत्रणासाठी बाबा रामदेवांनी सांगितला नवीन उपाय

देशातील वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी योग गुरू बाबा रामदेव यांनी एक नवीन उपाय सांगितला आहे.

  • Share this:

डेहादून, 27 मे : देशातील वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी योग गुरू बाबा रामदेव यांनी एक नवीन उपाय सांगितला आहे. हरिद्वारमध्ये पत्रकार परिषदेत बोलत असताना बाबा रामदेव म्हणाले की,'दोन अपत्यानंतर जन्माला येणाऱ्या मुलांना मतदान करण्याचा तसंच निवडणूक लढवण्याचा अधिकार दिला जाऊ नये. शिवाय, या मुलांना कोणत्याही सरकारी सोयीसुविधादेखील मिळू नयेत'

बाबा रामदेव पुढे असंही म्हणाले की,'ज्या प्रकारे देशाची लोकसंख्या वाढत आहे. भविष्यातील या समस्येचा सामना करण्यासाठी देशाची तयारी नाही. तसंच कोणत्याही परिस्थितीत पुढील 50 वर्षांत देशाच्या लोककसंख्येचा आकडा 150 कोटींहून अधिक वाढू नये'.

पाहा:VIDEO मनमाडचं पाणी संपलं! रेल्वे प्रवासी कसे देताहेत टंचाईला तोंड पाहा स्पेशल रिपोर्ट

लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी देशात कायदा होणं गरजेचं असल्याचंही मतं बाबा रामदेव यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले की, 'दोन अपत्यांनंतर जन्माला येणाऱ्या मुलांना मतदानाचा तसंच निवडणूक लढवण्याचा अधिकारच दिला जाऊ नये. सोबत या मुलांना कोणत्याही प्रकारच्या सरकारी सोयीसुविधा मिळण्यापासून वंचित ठेवलं जावं. मग त्या व्यक्ती कोणत्याही धर्माच्या असल्या तरीही सर्वांसाठी नियम सारखाच असावा. अशा प्रकारचा कायदा जेव्हा देशात लागू होईल तेव्हाच लोकसंख्या नियंत्रणात येऊ शकेल'.

पाहा : VIDEO शेगावमध्ये CCTV मध्ये दिसलेली 'ती' धडकी भरवणारी आकृती नेमकी कशाची?

पाहा :VIDEO : बारावीचा रिझल्ट उद्या लागणार; या आणि इतर महत्त्वाच्या टॉप 18 बातम्या

दारूबंदीची मागणी

'भारत हा संतांचा देश आहे. यामुळे देशभरात दारू बनवणं तसंच विक्री करण्यावर बंदी आणली गेली पाहिजे. जर इस्लामिक देशांमध्ये जर दारूबंदी लागू होऊ शकते तर मग आपल्या देशात हा बदल का होऊ शकत नाही?',असा प्रश्न उपस्थित करत बाबा रामदेव यांनी दारूबंदीची देखील मागणी केली.

VIDEO पार्थ पवार यांच्या पराभवाबद्दल पहिल्यांदाच बोलल्या सुप्रिया सुळे

First published: May 27, 2019, 9:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading