पतंजलीचं 'परिधान', योग मॅटपासून जीन्सपर्यंत सबकुछ!

पतंजलीचं 'परिधान', योग मॅटपासून जीन्सपर्यंत सबकुछ!

बाबा रामदेव यांच्या पतंजलीचा आता आणखी विस्तार होणार आहे. आयुर्वेदीक दुधापासून ते कपड्यांच्या शोरूम्स पर्यंत पंतजली आपला विस्तार करणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली,ता.15 जून : बाबा रामदेव यांच्या पतंजलीचा आता आणखी विस्तार होणार आहे. आयुर्वेदीक दुधापासून ते कपड्यांच्या शोरूम्स पर्यंत पंतजली आपला विस्तार करणार आहे. तर 2022 पर्यंत 50 हजार कोटींच्या उलाढालीचं उद्दीष्ट असल्याची माहिती पतंजलीचे कार्यकारी संचालक आचार्य बालकृष्ण यांनी दिली आहे.

रिटेल मार्केट आणि सौंदर्य प्रसाधनांमध्ये सध्या पतंजलीनं मोठी आघाडी घेतली आहे. त्यात आता भर पडणार असून आयुर्वेदीक दुधापासून ते कपड्यांच्या शोरूम्स पर्यंत पतंजली आपली मुद्रा उमटवणार आहे.

काय असेल 'परिधान' मध्ये?

कपड्यांया बाजारात पतंजली 'परिधान' या नावानं बाजारात येणार आहे. देशभरात 'परिधान'चे 100 शोरूम्स उघडणार असल्याची माहितीही आचार्य बालकृष्णन यांनी दिली. 'परिधान' मध्ये योग मॅट, स्पोर्टस् वेअर, लहान मुलांचे कपडे, टॉवेल्स,बेडशीट अशा विविध 3 हजार वस्तु असणार आहेत.

अशी असेल जीन्स?

पतंजलीने जीन्स बाजारात आणणार असल्याची घोषणा या आधीच केली आहे. हे जीन्स पुरूष आणि महिलांसाठी असणार असून पूर्णपणे भारतीय असणार आहे. आरामदायी, किफायतशीर आणि आकर्षक असे हे कपडे असून भारतीय संस्कृतीची त्यावर छाप असणार आहे.

50 हजार कोटींचं उद्दीष्ट

2018 या वर्षात पतंजलीच्या वाढीचा वेग थोडा मंदावला मात्र हे तात्परतं असून 2022 पर्यंत पतंजलीचं 50 हजार कोटींच्या उलाढालीचं उद्दीष्ट आहे.

First published: June 15, 2018, 3:23 PM IST

ताज्या बातम्या