बाबा रामदेव आंबेडकरांना म्हणाले 'वैचारिक दहशवादी'; Twitter वर ट्रोल, पतंजलीविरोधात हॅशटॅग ट्रेंडिंग

बाबा रामदेव आंबेडकरांना म्हणाले 'वैचारिक दहशवादी'; Twitter वर ट्रोल, पतंजलीविरोधात हॅशटॅग ट्रेंडिंग

योगगुरू आणि व्यावसायिक बाबा रामदेव यांनी एका टीव्ही चॅनेलवर दिलेल्या मुलाखतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बोलताना 'intellectual terrorists' असा उल्लेख केल्याने वाद ओढवला आहे.

  • Share this:

मुंबई, 18 नोव्हेंबर : योगगुरू आणि व्यावसायिक बाबा रामदेव यांनी एका टीव्ही चॅनेलवर दिलेल्या मुलाखतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बोलताना 'intellectual terrorists' असा उल्लेख केल्याने वाद ओढवला आहे. Twitter वर #ShutdownPatanjali  आणि #ArrestRamdev असे हॅशटॅग रविवारपासून ट्रेंड करत होते.

जातीनिर्मूलनाचे कार्य करणारे पेरियार ई. व्ही. रामस्वामी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैचारिक दहशतवादी असल्याचं धक्कादायक विधान रामदेव बाबांनी केलं आणि सोशल मीडियावर रामदेव यांच्याविरोधात लाट उठली. पतंजलीवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन करण्यात येत आहे. रामदेव यांची ही मुलाखत 11 नोव्हेंबरला टीव्हीवर प्रसारित झाली होती. अनेकांनी याबद्दल रामदेव यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. आदिवासी हक्कासाठी लढणारे नेते हंसराज मीना, प्रा. दिलीप मोंडल यांनी रामदेव बाबांवर कडक शब्दांत टीका केली आहे. ट्वीट करत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात.

ऑल इंडिया प्रोग्रेसिव्ह विमेन्स असोसिएशनच्या कविता कृष्णन यांनीदेखील रामदेव बाबांचा निषेध करत टीका केली आहे.

कविता कृष्णन कम्युनिस्ट पार्टीच्या पोलिट ब्युरो सदस्य आहेत.

-----------------------------

अन्य बातम्या

सोशल मीडियावरची पोस्ट पडली महागात, एका फोटोनं संपवलं क्रिकेटपटूचं करिअर

महाराष्ट्रात सत्तेची समीकरणं जुळतानाच नरेंद्र मोदींनी केलं राष्ट्रवादीचं कौतुक

शिवसेनेची अभूतपूर्व कोंडी! भाजपशी काडीमोड पण नव्या संसारातही कुरबुरी

पंतप्रधानांचा फोटो वापरताय? काळजी घ्या नाहीतर खावी लागेल तुरुंगाची हवा

First Published: Nov 18, 2019 04:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading