'मोदींना हरवण्यासाठी मु्स्लीम देशातून येतो आहे पैसा' - बाबा रामदेव

'मोदींना हरवण्यासाठी मु्स्लीम देशातून येतो आहे पैसा' - बाबा रामदेव

योगगुरू बाबा रामदेव यांनी गेले अनेक दिवस मौन पाळलं होतं पण आता ते राजकारणात सक्रिय झाले आहेत. मोदींना हरवण्यासाठी मुस्लीम देशांमधून कोट्यवधी रुपयांचा निधी येतो आहे, असं वक्तव्य बाबा रामदेव यांनी केलं आहे.

  • Share this:

जयपूर, 17 एप्रिल : योगगुरू बाबा रामदेव यांनी गेले अनेक दिवस मौन पाळलं होतं पण आता ते राजकारणात सक्रिय झाले आहेत. लोकसभेच्या रणधुमाळीत ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समर्थनासाठी प्रचार करत आहेत.

मोदींना हरवण्यासाठी मुस्लीम देशांमधून कोट्यवधी रुपयांचा निधी येतो आहे, असं वक्तव्य बाबा रामदेव यांनी केलं आहे. 'भारत देशात आणि देशाबाहेरही राष्ट्रविरोधी शक्तींच्या कारवाया सुरू आहेत. ख्रिश्चनधर्मीय आणि मुस्लीम देशांमधून हा पैसा येतो आहे. मोदींनी सत्तेत येऊ नये यासाठीच्या कारवायांसाठी कोट्यवधी रुपयांचा पैसा पुरवला जात आहे', असं बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे.

भारतातल्या जनतेने भाजपला मतदान करावं, असं आवाहन बाबा रामदेव यांनी केलं. केंद्रीय मंत्री राज्यवर्धन राठोड यांना पाठिंबा देण्यासाठी बाबा रामदेव जोधपूरला गेले होते. तिथे त्यांनी हे वक्तव्य केलं. भारताला सुपरपॉवर बनवायचं असेल तर मोदींना जास्तीत जास्त पाठिंबा दिला पाहिजे. देश त्यांच्याच हातात सुरक्षित आहे, असंही बाबा रामदेव म्हणाले.

काळ्या पैशाच्या मुद्द्यावरून आंदोलन

बाबा रामदेव यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा जाहीर प्रचार केला होता पण नंतर मात्र काळ्या पैशाच्या मुद्द्यावरून त्यांनी मोदी सरकारला खडे बोल सुनावले होते. मोदी सरकार परदेशातला काळा पैसा भारतात आणू शकलं नाही, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. याआधी त्यांनी काळ्या पैशाच्या मुद्द्यावरूनच यूपीए सरकारच्या विरोधात आंदोलन केलं होतं. बाबा रामदेव यांनी आता केलेल्या वक्तव्यावरून राजकीय धुरळा उडण्याची चिन्हं आहेत.

======================================================================================================================================================================

VIDEO : उमेदवारी जाहीर झाल्यानंतर साध्वी म्हणाल्या...

First published: April 17, 2019, 9:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading