पंचकूला, (हरियाणा), 25 ऑगस्ट : डेरा सच्चा सौदाचे प्रमुख राम रहीम याला साध्वी बलात्कार प्रकरणी कोर्टाने दोषी ठरवलं असून या खटल्याचा निकाल 28 तारखेला होणार सुनावला जाणार आहे. विशेष सीबीआय कोर्टाच्या परिसरात बाबा रहिमच्या समर्थकांनी कुठलाही हिंसाचार करू यासाठी कोर्टाच्या परिसरात लष्कर आणि सीआरपीएफचा ताफा तैनात करण्यात आलाय.
विशेष सीबीआयने बाबा रहिमला साध्वी बलात्कार प्रकरणात दोषी ठरवताच हरियाणा पोलिसांनी त्याला अटक केलीय. बाबा रहिमच्या अटकेनंतर या रहियाणात मोठा तणाव पसरलाय. बाबाच्या समर्थकाकडून सार्वजनिक मालमत्तांचं नुकसान होऊ नये. यासाठी या परिसरातून जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्यात. एवढंच नाहीतर कोर्टाचा पंचकूला सपूर्ण परिसर लष्कराने ताब्यात घेतलाय. तसंच या सपूर्ण परिसरातील इंटरनेट सेवाही गेल्या 72 तासापासून बंद करण्यात आलीय. तरीही बाबाच्या हजारो समर्थकांनी कोर्ट परिसरात मोठी गर्दी केलीय. त्यामुळे बाबा रहीमला कोर्टापर्यंत नेण्यात लष्कराला त्रास सहन करावा लागलाय. दरम्यान, बाबाच्या समर्थकांनी हिंसाचार घडवण्याचा प्रयत्न केलाच तर न भिता बळाचा वापर करा,आणि ही झुंडशाही मोडून काढा. असे स्पष्ट आदेश कोर्टाने दिलेत. कारण स्थानिक राजकारणी आणि प्रशासन या बाबा रहीमच्या लाखो अनुयायांच्या दबावापुढे झुकत असल्याचं यापूर्वी अनेकदा स्पष्ट झालंय. म्हणूनच हा खटला सीबीआयकडे वर्ग करण्यात आलाय.
काय आहे बाबा रहीमचं बलात्कार प्रकरण ?
बाबा राम रहिमवर त्याच्याच आश्रमातील एका साध्वीने बलात्काराचा आरोप केलाय. यासंबंधी तिने आपल्यावरील अन्यायाची थेट पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना एक चिठ्ठीही लिहिली होती. पण बाबावर काहीच कारवाई झाली नाही. अखेर एका स्थानिक दैनिकाने या पीडीत मुलीची चिठ्ठी छापताच हे बलात्कार प्रकरण चव्हाट्यावर आलं. हे प्रकरण दडपण्यासाठी बाबा रहीमच्या समर्थकांनी या पीडित साध्वीचा भाऊ आणि ती चिठ्ठी छापलेल्या दैनिकाच्या संपादकीचीही हत्या केलीय. साधारण 2002सालचं हे प्रकरण आहे. खरंतर स्थानिक पोलिसांनी बाबा रहीमच्या दबावापुढे हे सर्व प्रकरण दडपण्याचा प्रयत्न चालवला होता. पण संपादक रामचंद्र यांची बाबा रहीमच्या समर्थकांनी गोळी घालून हत्या करताच हे सपूर्ण प्रकरण सीबीआयकडे देण्यात आलंय. त्याचीच सुनावणी आता अंतिम टप्प्यात आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा