Home /News /national /

मामाचं ताबीज करेल कोरोनापासून संरक्षण, या मंत्रीमहोदयांनी उधळली मुक्ताफळं

मामाचं ताबीज करेल कोरोनापासून संरक्षण, या मंत्रीमहोदयांनी उधळली मुक्ताफळं

कोरोना काळात लाखोंची गर्दी एकत्र आली तरी मामाचं ताबीज असल्यामुळे (Baba amulet will protect crowd from corona says minister) कुणालाही काहीही होणार नाही, असं वक्तव्य एका मंत्र्यांनी केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

    इंदूर, 2 डिसेंबर: कोरोना काळात लाखोंची गर्दी एकत्र आली तरी मामाचं ताबीज असल्यामुळे (Baba amulet will protect crowd from corona says minister) कुणालाही काहीही होणार नाही, असं वक्तव्य एका मंत्र्यांनी केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मध्यप्रदेशच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या कॅबिनेट मंत्री उषा ठाकूर यांच्या या विधानामुळे (Controversial statement by Usha Thakur) राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कोरोना काळात मास्क न वापरण्यासाठी कुप्रसिद्ध ठरलेल्या ठाकूर यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. काय म्हणाल्या ठाकूर मध्यप्रदेशमध्ये मामा टंट्या भिल यांचा बलिदान दिवस दरवर्षी 4 डिसेंबरला साजरा करण्यात येतो. आदिवासी समाजातील लाखो बांधव यावेळी एकत्र येत असतात. सर्वसामान्य नागरिकांसाठी आस्थेचं स्थान असलेल्या या उत्सवात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी जमू नये, यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र उषा ठाकुरांसारख्या मंत्र्यांच्या बेजबाबदार वक्तव्यामुळे त्याला सुरुंग लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मामा टंट्या भिल यांच्या ताबीजमुळे कुणालाही कोरोना होणार नाही आणि झालेल्यांचा आजारही दूर होईल, असं त्या म्हणाल्या आहेत. ताबीज करेल कमाल ओमिक्रॉन व्हेरियंट भारतातही आढळल्यानंतर आता यंत्रणा सतर्क झाल्या असून नवे निर्बंध आखण्याची धोरणं सरकारी पातळीवर सुरू झाली आहेत. अशा परिस्थितीत मध्यप्रदेशात मामा टंट्या यांच्या बलिदान दिनी लाखोंची गर्दी जमण्याची शक्यता आहे. याबाबत बोलताना गर्दीची चिंता करण्याचं कारण नसल्याचं वक्तव्य ठाकूर यांनी केलं आहे. मामांच्या ताबीजमुळे कुणालाही कोरोना होणार नाही आणि ज्यांना कुठलाही आजार असेल, तोदेखील बरा होईल, असं वक्तव्य करत त्यांनी गर्दीला प्रोत्साहन दिल्याचं सांगितलं जात आहे. हे वाचा-परराज्यातून येणाऱ्यांना नवे नियम, शाळांबाबतही पुनर्विचार; अजित पवारांची घोषणा मास्क न वापरण्याबद्दल चर्चेत शंख वाजवल्यामुळे आणि यज्ञ-हवन केल्यामुळे कोरोना होत नाही, असं म्हणत त्यांनी जाहीरपणे मास्क वापरायला नकार दिला होता. त्यामुळे त्या काही महिन्यांपूर्वी चर्चेत आल्या होत्या. आता नवं वादग्रस्त वक्तव्य करून त्यांनी पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Corona, Madhya pradesh

    पुढील बातम्या