मराठी बातम्या /बातम्या /देश /दानशूर अझीम प्रेमजींची कंपनी Wipro ठरली तिसरी सर्वात मोठी IT फर्म, वयाच्या 21 व्या वर्षापासून सुरू केला होता व्यवसाय

दानशूर अझीम प्रेमजींची कंपनी Wipro ठरली तिसरी सर्वात मोठी IT फर्म, वयाच्या 21 व्या वर्षापासून सुरू केला होता व्यवसाय

विप्रो लिमिटेडने (Wipro Ltd) गुरुवारी पहिल्यांदाच बाजार भांडवलात (Market capitalisation) 3 ट्रिलियनपर्यंत मजल मारली आहे. यासह विप्रो तिसरी भारतीय आयटी फर्म (Indian IT company) ठरली आहे.

विप्रो लिमिटेडने (Wipro Ltd) गुरुवारी पहिल्यांदाच बाजार भांडवलात (Market capitalisation) 3 ट्रिलियनपर्यंत मजल मारली आहे. यासह विप्रो तिसरी भारतीय आयटी फर्म (Indian IT company) ठरली आहे.

विप्रो लिमिटेडने (Wipro Ltd) गुरुवारी पहिल्यांदाच बाजार भांडवलात (Market capitalisation) 3 ट्रिलियनपर्यंत मजल मारली आहे. यासह विप्रो तिसरी भारतीय आयटी फर्म (Indian IT company) ठरली आहे.

नवी दिल्ली, 3 जून : विप्रो लिमिटेडने (Wipro Ltd) गुरुवारी पहिल्यांदाच बाजार भांडवलात (Market capitalisation) 3 ट्रिलियनपर्यंत मजल मारली आहे. यासह विप्रो तिसरी भारतीय आयटी फर्म (Indian IT company) ठरली आहे. गुरुवारी शेअर बाजारात सुरुवातीच्या व्यवहारादरम्यान विप्रोचे शेअर 550 रुपयांच्या उच्चांकी रेकॉर्ड स्तरावर पोहोचले आणि याचा मार्केट कॅप 3.01 ट्रिलियन इतका होता.

दानशूर विप्रोचे संस्थापक -

विप्रोचे संस्थापक आणि अध्यक्ष अझीम प्रेमजी (Azim Premji) यांचं नाव संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. प्रेमजी यांनी आपल्या दूरदर्शी विचारांनी आणि मेहनतीने विप्रोला संपूर्ण जगभरात एक ओळख मिळवून दिली. श्रीमंत भारतीयांमध्ये प्रेमजी यांच्या समावेश आहे. परंतु त्यांची विशेष बाब म्हणजे, दान करण्यात ते कायम पुढे असतात. हुरून इंडिया परोपकारी लिस्टनुसार, कोरोना संकट काळात प्रेमजी यांनी दररोज 22 कोटी रुपये दान केले आहेत. 75 वर्षीय अझीम प्रेमजी अजूनही 52 वर्षापूर्वी ज्या उत्साहाने काम करायचे त्याच उत्साहाने ते आजही काम करतात.

तेल व्यवसाय -

1945 मध्ये मुंबईत अझीम प्रेमजी यांचा जन्म झाला. त्यांचे वडील मोहम्मद हमेश प्रेमजी एक प्रतिष्ठित व्यापारी होते. त्यांनी वेस्टर्न इंडियन व्हेजिटेबल प्रोडक्ट्स लिमिडेटची स्थापना केली होती. ज्यात व्हेजिटेबल शॉर्टनिंग (डालडा) आणि रिफाइंड तेलाचं उत्पादन केलं गेलं. डालडा जे नाव आज भारतात घरोघरी प्रसिद्ध नाव आहे, विप्रोचं हे सर्वात जुनं उत्पादन आहे.

अर्धवट सोडावं लागलं होतं शिक्षण -

मुंबईत आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर, अझीम प्रेमजी यांनी अमेरिकेतील स्टेनफोर्ड यूनिव्हर्सिटीमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केलं. त्यानंतर त्यांच्या वडिलांचं निधन झाल्यानंतर त्यांना 1966 मध्ये आपला कौंटुंबिक व्यवसाय सांभाळावा लागला. त्यांचा कौंटुंबिक व्यवसाय हायड्रो जनरेटेड कुकिंग फॅटचा होता. त्यावेळी अझीम प्रेमजी यांचे वडील तांदळाचे मोठे व्यापारी होते. त्यानंतर केवळ 21 व्या वर्षी प्रेमजी विप्रोचे अध्यक्ष बनले. विप्रोची स्थापना वेस्टर्न व्हेजिटेबल प्रोडक्ट कंपनी रुपात 1945 मध्ये झाली होती.

(वाचा - या दानशुराला सलाम! 2020 मध्ये अझीम प्रेमजी यांनी दररोज दान केले 22 कोटी)

तेल कंपनी ते आयटी कंपनी -

विप्रो सर्वात आधी वेस्टर्न व्हेजिटेबल उत्पादन बनवणारी कंपनी म्हणून ओळखली जात होती. परंतु अझीम प्रेमजी यांनी हे बदलून बेकरी प्रोडक्ट्स, टॉयलेटसंबंधी उत्पादन, केसांसंबंधी उत्पादन, लहान मुलांची उत्पादनं बनवणारी कंपनी असे बदल केले. विप्रो कंपनीने 1980 मध्ये IT जगात पाऊल ठेवलं. त्यावेळी IBM कंपनी भारत सोडून चालली होती, याचाच फायदा विप्रोला झाला.

विप्रोने अमेरिकेतील अनेक कंपन्यांसह अनेक बिजनेस डिल केल्या आणि त्यानंतर कंपनीने यशाची अनेक शिखरं पार केली. त्यानंतर विप्रोने इतरही अनेक क्षेत्रात पाऊल ठेवलं.

First published: