News18 Lokmat

मसूद अझहर होता मोठ्या दहशतवादी हल्ल्याच्या तयारीत?

मसूद अझहरचा मृत्यू झाल्यानं आता जैश ए मोहम्मदला मोठा धक्का बसला आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 3, 2019 05:54 PM IST

मसूद अझहर होता मोठ्या दहशतवादी हल्ल्याच्या तयारीत?

श्रीनगर, 3 मार्च : जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरचा किडनीच्या आजारानं मृत्यू झाला आहे. पुलवामामध्ये केलेल्या आत्मघातकी हल्ल्यानंतर पुन्हा एकदा भारतीय सैन्याला लक्ष्य करण्याच्या तयारीमध्ये अझहर होता. दहशतवाद्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण करण्यासाठी जैश - ए - मोहम्मद पुलवामा हल्ल्याचा व्हिडीओ देखील जारी करण्याच्या तयारीत होती. 'टाईम्स ऑफ इंडिया'नं याबाबतचं वृत्त दिलं होतं.

जैश ए मोहम्मदनं 500 किलो स्फोटकं या हल्ल्यासाठी तयार ठेवली होती. शिवाय, आत्मघातकी हल्ल्यासाठी वापरली जाणारी गाडी देखील तयार ठेवण्यात आली होती. तसेच जम्मू - काश्मीर किंवा बाहेर देखील हल्ला करण्याचा जैशचा प्लॅन होता. या संभाव्य हल्ल्याबद्दल लष्कराला सतर्क करण्यात आलं होतं. पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते.

दरम्यान, आता मसूदच्या मृत्यूमुळं जैशला मोठा धक्का बसला आहे.


आयएसआयची मदत

Loading...

पुलवामा हल्ला करण्यामागे आयएसआय या पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेनं दहशतवाद्यांना मदत केली होती. त्यामुळे पुलवामा येथे हल्ला झाला होता. सध्या एनआयए या दहशतवादी हल्ल्याचा तपास करत आहे.

300 किलो स्फोटकांनी भरलेली गाडी जवानांच्या गाडीवर आदळून 14 फेब्रुवारी रोजी जवानांच्या ताफ्याला लक्ष्य करण्यात आलं. यामध्ये 40 जवान शहीद झाले. आदिल दर या दहशतवाद्यानं स्फोटकांनी भरलेली गाडी जवानांच्या ताफ्यावर आदळली होती. दरम्यान, जैश - ए - मोहम्मदनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.


भारताचा एअर स्ट्राईक

दहशतवाद्यांनी खूप मोठी चूक केली आहे. त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील असा सरळ इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांना दिला होता. त्यानंतर एअर स्ट्राईक करत भारतानं 200 ते 300 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. शिवाय, भारतानं पाकिस्तानच्या मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेतला. तसेच पाकिस्तानी वस्तुंवर 200 टक्के आयात शुल्क देखील लावले.


चौघाना धडक देत त्यानं आणखी दामटला ट्रक; थरारक घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 3, 2019 05:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...