खराब हवामान की, वीज पडली? शेतात कोसळले विमान, पायलट जागीच ठार

खराब हवामान की, वीज पडली? शेतात कोसळले विमान, पायलट जागीच ठार

आझमगड जिल्ह्यातील सरायमीर पोलीस स्टेशन क्षेत्रातील फरिद्दीनपूर गावात सोमवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

  • Share this:

आझमगड, 21 सप्टेंबर : उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) आझमगड (Azamgarh) जिल्ह्यातील निजामाबाद क्षेत्रात सोमवारी सकाळी अमेठीच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण अॅकडमी (IGRUA) चे एक चार आसनी टीबी-20 विमान क्रॅश झाले.  या अपघातात पायलटचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान उडवत असलेल्या शिकावू पायलट कोणार्क सरन (वय 30) यांचा अपघातात जागीत मृत्यू झाला. आझमगड जिल्ह्यातील सरायमीर पोलीस स्टेशन क्षेत्रातील फरिद्दीनपूर गावात सोमवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. हवामान खराब असल्यामुळे विमान एका शेतात कोसळले. विमान कोसळल्यानंतर मोठा आवाज झाला. त्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

मराठी मालिकेचं शूटिंग ठरलं धोकादायक; 27 जणांना संसर्ग, अभिनेत्री गंभीर

या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना आणि अग्निशमन दलाला देण्यात आली. माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली.

हे छोटे विमान होते. या दुर्घटनेत या विमानाचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. आझमगडचे जिल्हाधिकारी अरुण कुमार यांनी सांगितले की,  दुर्घटनाग्रस्त विमान अमेठी येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण अ‍ॅकडमी (IGRUA) चे होते. शिकावू पायलट कोणार्क सरन यांनी अमेठीवरून एकट्याने उड्डाण केले होते. त्यांच्यासोबत इतर कुणीही नव्हते.

पोलीस अधिकाऱ्यांबाबत विधानावरून फडणवीसांचा गृहमंत्र्यांवर घणाघात

आझमगड येथील निझामाबाद परिसरात आल्यानंतर खराब हवामानामुळे अचानक विमानावरील नियंत्रण सुटले आणि  सरायमीर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सीमेवर विमानाचे क्रॅश लँडिंग झाले.

या विमानाने  इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण अ‍ॅकडमी येथून उड्डाण भरले होते. खराब हवामानामुळे किंवा विमानावर वीज कोसळल्यामुळे ही दुर्घटना घडली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे.

Published by: sachin Salve
First published: September 21, 2020, 4:01 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading