'आप की आँखों में आँखे डालकर देखता रहूँ', रमा देवींबद्दल आझम खान यांचं वक्तव्य

'आप की आँखों में आँखे डालकर देखता रहूँ', रमा देवींबद्दल आझम खान यांचं वक्तव्य

लोकसभेमध्ये तिहेरी तलाक विधेयकाच्या चर्चेमध्ये समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान यांच्या वक्तव्यामुळे गदारोळ झाला. भाजपच्या खासदार आणि लोकसभेच्या अध्यक्ष रमा देवी यांना उद्देशून आझम खान म्हणाले, तुम्ही मला एवढ्या आवडता की मनात येतं तुमच्या डोळ्यात डोळे घालून बघत राहावं.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 जुलै : लोकसभेमध्ये तिहेरी तलाक विधेयकाच्या चर्चेमध्ये समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान यांच्या वक्तव्यामुळे गदारोळ झाला. त्यांनी लोकसभेच्या अध्यक्ष रमा देवी यांच्याबदद्ल वैयक्तिक टिप्पणी केली.

भाजपच्या खासदार आणि लोकसभेच्या अध्यक्ष रमा देवी यांना उद्देशून आझम खान म्हणाले, तुम्ही मला एवढ्या आवडता की मनात येतं तुमच्या डोळ्यात डोळे घालून बघत राहावं.

आझम खान यांच्या या वक्तव्यावर लोकसभेच्या सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतला. भाजपच्या मंत्र्यांनीही आझम खान यांनी याबदद्ल माफी मागावी, अशी मागणी लावून धरली. केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी आझम खान यांच्या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त केली. माझ्या 19 वर्षांच्या संसदेतल्या कारकिर्दीमध्ये मी लोकसभा अध्यक्षपदावर असलेल्या व्यक्तीबद्दल असं वक्तव्य ऐकलं नव्हतं. खासकरून महिला लोकसभा अध्यक्षांबद्दल कुणीही असं विधान केलेलं नाही, असं ते म्हणाले.

यावर आझम खान यांनी, आपण कोणतंही असंसदीय विधान केलेलं नाही, असं स्पष्टीकरण दिलं. रमा देवी या माझ्या बहिणीसारख्याच आहेत, असं ते म्हणाले. माझ्या विधानात जर काही अयोग्य आढळलं तर मी राजीनामा देईन, असंही त्यांनी ठासून सांगितलं.

VIDEO : अभिनंदनसारखं तुम्हीही पाडू शकता पाकचं एफ-16 विमान

यावर अखिलेश यादव यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. आझम खान यांच्या वक्तव्यामध्ये मला काही आक्षेपार्ह वाटलं नाही पण त्यांचं विधान असंसदीय असेल तर ते कामकाजातून वगळून टाकावं, असं त्यांनी म्हटलं आहे.

तिहेरी तलाक विधेयकावरच्या या चर्चेत भाजपच्या खासदार मीनाक्षी लेखी आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्यातही वाद झाला. उत्तर प्रदेशमध्ये तिहेरी तलाक देण्याच्या घटनांबद्दल मीनाक्षी लेखी यांनी अखिलेश यादव यांच्या सरकारला जबाबदार ठरवलं.

=============================================================================================

सचिन अहिरांनी शिवसेना प्रवेशाबद्दल शरद पवारांना काय सांगितलं? पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Azam Khan
First Published: Jul 25, 2019 04:07 PM IST

ताज्या बातम्या