मराठी बातम्या /बातम्या /देश /

सावधान! गुळवेल म्हणून तुम्ही भलतंच काहीतरी वापरत नाही ना; आयुष मंत्रालयाचा इशारा

सावधान! गुळवेल म्हणून तुम्ही भलतंच काहीतरी वापरत नाही ना; आयुष मंत्रालयाचा इशारा

मंत्रालयाचे म्हणणे आहे की, गुळवेलचा वापर करणे फायदेशीर आहे, परंतु, गुळवेलप्रमाणे दिसणारी बाजारातील दुसरी उत्पादनं घेतल्यानं लोकांची फसवणूक तर होतेच आणि त्यांचा वापर शरीरासाठी हानिकारक असू शकतो.

मंत्रालयाचे म्हणणे आहे की, गुळवेलचा वापर करणे फायदेशीर आहे, परंतु, गुळवेलप्रमाणे दिसणारी बाजारातील दुसरी उत्पादनं घेतल्यानं लोकांची फसवणूक तर होतेच आणि त्यांचा वापर शरीरासाठी हानिकारक असू शकतो.

मंत्रालयाचे म्हणणे आहे की, गुळवेलचा वापर करणे फायदेशीर आहे, परंतु, गुळवेलप्रमाणे दिसणारी बाजारातील दुसरी उत्पादनं घेतल्यानं लोकांची फसवणूक तर होतेच आणि त्यांचा वापर शरीरासाठी हानिकारक असू शकतो.

    नवी दिल्ली, 07 ऑक्टोबर : कोरोना महामारीपासून गुळवेलच्या (giloy or guduchi) अनेक गोष्टींचा वापर देशात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी लोक अजूनही गुळवेलचा रस, गुळवेलच्या बाटी, गुळवेल काढा इत्यादी बाबी पितात. मात्र, पोस्ट कोविड इफेक्ट म्हणून अनेक बाबी समोर आल्यानंतर आता आयुष मंत्रालयानं गुळवेलच्या (giloy) म्हणजेच गुडूचीच्या वापराबद्दल चिंता व्यक्त केली आहे. मंत्रालयाचे म्हणणे आहे की, गुळवेलचा वापर करणे फायदेशीर आहे, परंतु, गुळवेलप्रमाणे दिसणारी बाजारातील दुसरी उत्पादनं घेतल्यानं लोकांची फसवणूक तर होतेच आणि त्यांचा वापर शरीरासाठी हानिकारक असू शकतो. आयुष मंत्रालयाने गुळवेलच्या (टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया) वापरासंदर्भातील सुरक्षिततेविषयच्या शंका दूर केल्या आहेत. मंत्रालयानं असं म्हटलं आहे की, गुळवेलसारख्या वनस्पती जसे टिनोस्पोरा क्रिस्पा इत्यादी आरोग्यासाठी बरेच हानिकारक असू शकतात. गुळवेल ही एक लोकप्रिय औषधी वनस्पती आहे, जी गिलोय म्हणून ओळखली जाते आणि ती आयुष्‍य पद्धतीमध्ये दीर्घकाळ वापरली जात आहे. गुळवेल (टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया) ची सुरक्षा आणि कार्यक्षमता सिद्ध करण्यासाठी पीअर रिव्ह्यू इंडेक्स जर्नल्समध्ये अनेक संशोधने प्रकाशित झाली आहेत. त्याचे हेपेटो-संरक्षणात्मक गुणधर्म देखील महत्त्वाचे आहेत. गुळवेलमध्ये असलेल्या अनेक औषधी घटकांमुळे त्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. तसेच कोविडच्या भीतीमुळे यासारख्या औषधी उत्पादनांचा वापर देखील वाढला आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार असे आढळून आले आहे की, गुळवेलच्या विविध प्रजाती उपलब्ध आहेत. परंतु, वैद्यकीय सायन्सनुसार फक्त टिनोस्पोरा कॉर्डिफोलियाचा वापर केला पाहिजे. त्याच्या समतुल्य प्रजातींच्या गुणधर्मांमध्ये आणि फॉर्ममध्ये खूप फरक असून जे ओळखले जाणे आवश्यक आहे. खरी गुळवेल किंवा गुडूची अशी असते - - गर्द हिरवा रंगाचे आहे. - यात लहान वक्र फ्लॅंज नाही. -त्याच्या देठापासून दुधासारखा स्राव नाही. - गुळवेलची पानं हृदयाच्या आकाराची असतात जी खालच्या दिशेने वक्र असतात. त्याच्या पाकळ्यांची संख्या सहा आहे. कर्नल फळ (फळांचे गुच्छ) गोलाकार किंवा चेंडूच्या आकाराचे आणि लाल रंगाचे असते. हे वाचा - बये दार उघड! मंदिरं उघडण्याच्या पहिल्याच दिवशी असं काय झालं की दर्शन थांबलं? कोल्हापुरात खळबळ बनावट गुळवेल म्हणजे टिनोस्पोरा क्रिस्पा - . तो राखाडी रंगाचा आहे. . स्टेममध्ये एक लहान वक्र पसरलेला भाग असतो. . त्याच्या देठापासून दुधासारखा स्राव असतो. . त्याची पाने हृदयाच्या आकाराची आहेत आणि खाली वक्र नाहीत. . पाकळ्यांची संख्या तीन आहे. . फळांचे कर्नल किंवा गुच्छ लंबवर्तुळाकार किंवा रग्बी बॉलच्या आकाराचे नारंगी रंगाचे असतात. वैद्यकीय सल्ला आयुष मंत्रालय म्हणते की, गुळवेल हे एक सुरक्षित आणि प्रभावी आयुर्वेदिक औषध आहे. मात्र, त्याचा वापर योग्य नोंदणीकृत आयुष व्यवसायीशी सल्लामसलत केल्यानंतरच केला जातो. हे वाचा - Kaun Banega Crorepati 13 : हॉटसीटवरील पुण्याच्या ‘या’ तरुणीसोबत Amitabh Bachchan यांचे खास संबंध मंत्रालयच्या म्हणण्यानुसार आयुषकडे फार्माकोविजिलेंसची एक योग्य प्रणाली आहे.(आयुष औषधांमधून संशयास्पद प्रतिकूल औषधांच्या प्रतिक्रियांचे अहवाल देण्यासाठी) संपूर्ण भारतात पसरलेल्या नेटवर्कसह. आयुष औषधांच्या सेवनानंतर कोणतीही संशयास्पद प्रतिकूल घटना घडल्यास, ती जवळच्या फार्माकोविजिलेन्स सेंटरला आयुष चिकित्सकाद्वारे कळवली जाऊ शकते. या व्यतिरिक्त, केवळ नोंदणीकृत आयुष डॉक्टरांच्या देखरेखीखाली आणि सल्लामसलत करून आयुष औषध आणि उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips

    पुढील बातम्या