अयोध्या प्रकरणाबाबत पंडित नेहरूंनी तेव्हा जे सांगितलं ते आज घडतंय

अयोध्या प्रकरणाबाबत पंडित नेहरूंनी तेव्हा जे सांगितलं ते आज घडतंय

6 डिसेंबर 1949 रोजी बाबरी मशीदमध्ये गुपचूप राम आणि देवतांच्या मूर्ती ठेवण्यात आल्या. त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू काय म्हणाले होते?

  • Share this:

नवी दिल्ली, 09 नोव्हेंबर: सर्वोच्च न्यायालय आज 10.30 वाजता ऐतिहासिक अयोध्या प्रकरणी निकालपत्राचे वाचन करणार आहे. राम जन्मभूमी आणि बाबरी मशीदीच्या या वादावर निर्णय देण्यात येणार आहे. शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने संकेतस्थळावर या प्रकरणाबद्दलची माहिती दिली आहे.

अयोध्या प्रकरणी 1949 रोजी पंडित जवाहरलाल नेहरुंनी जे सांगितलं होतं ते आज खरं होत असल्याचं पाहायला मिळत आहे. एवढ्या वर्षांमध्ये अयोध्या आणि राम मंदिर हा मतांचा विषय होत असल्यानं अधिक संवेदनशील आहे. 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडण्यात आली आणि त्याचे पडसाद मुंबई, बांग्लादेश आणि पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून आले. त्यानंतर अयोध्या वादाला तोंड फुटले. 21 आणि 22 डिसेंबर 1949 रोजी बाबरी मशीद असलेल्या ठिकाणी राम आणि देवांच्या मूर्ती रातोरात ठेवण्यात आल्या. त्यानंतर देशभरामध्ये बाबरी मशीद आणि राम जन्मभूमीवर वाद निर्माण झाला. त्यावेळी देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू तर गृहमंत्री सरदार पटेल होते. त्यावेळी अयोध्या वादावर नेहरूंनी वक्तव्य केलं होतं. त्यावेळी त्यांच्या सांगण्याकडे कानाडोळा केला असला तरीही आजच्या घडीला त्यांनी जी परिस्थिती दुरदृष्टीचा विचार करून सांगितली होती. तशी स्थिती आजच्या घडीला अयोध्या प्रकरणाची आहे.

अयोध्या प्रकरण हा अतिशय संवेदन विषय आहे. ज्यावेळी अयोध्येमध्ये रामाची मूर्ती ठेवण्यात आली तेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावाचे होते. त्यावेळी शेख अब्दुल्ला आजाद काश्मीरची मागणी करत होते. तर दुसरीकडे काश्मीर भारतापासून वेगळा करण्यासाठी काश्मीरमधील काही नेत्यांचे प्रयत्न सुरू होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर काश्मीर भारतापासून कोणत्याही परिस्थितीत वेगळा होऊ नये यासाठी पंडित नेहरू यांनी प्रयत्न केले. त्यावेळी नेहरू सरकार मूर्ती बाबरी मशीदीतून हटवण्याच्या प्रयत्नात होते. मात्र फैजाबादमधील डीएमनी त्या हटवण्यास तीव्र विरोध केल्यामुळे त्यावेळी ते करणं शक्य झालं नाही. मात्र त्यावेळी ह्या सगळ्या प्रकरणामागे ताकदवर लोकतर नसतील?ज्यांना हा वाद निर्माण करून शांततेचा भंग करायचा होता अशीही एक शंका वारंवार उपस्थित केली जात होती.

26 डिसेंबर 1949 रोजी नेहरूंनी पंत यांना टेलिग्राम पाठवले. अयोध्येतील घटनाक्रम पाहून त्यांनी चिंता व्यक्त केली. 'मी आशा करतो की तुम्ही तातडीनं या प्रकरणी दाखल देऊन हे प्रकरण मार्गी लावाल'. हे प्रकरण मार्गी लागलं नाही तर आपण खूप मोठं उदाहरण जनतेसमोर ठेवू आणि त्याचे पडसाद दीर्घकालावधीपर्यंत असतील'. अशी भीती त्यावेळी नेहरूंनी व्यक्त केली होती. य़ा पत्रासोबत नेहरूंच्या साहित्यामध्ये एक टिपणी लिहिण्यात आल्याचंही आढळून आलं आहे. फैजाबाद जिल्ह्यातील अयोध्या इथे अंधविश्वासाच्या आधारावर राम मंदिर आणि देवतांच्या मूर्ती स्थापित केल्याचा दावा केला आहे. 16 व्या शतकामध्ये हिंदू मंदिर पाडून मशीद उभारण्यात आल्याचाही दावा केला जातो. राम मंदिर आणि बाबरी मशीद विवादामध्ये सरकारने हस्तक्षेप करत ती जागा सिल केली आणि त्यानंतर न्यायालयात हे प्रकरण गेले.

अयोध्या प्रकरणाबाबत अनेक दावे प्रतिदावे करण्यात आले. त्या दाव्यांमधून किंवा कोणत्याही पत्र किंवा संदेशातून शांततेचा भंग होऊ नये यासाठी सरकारने हस्तक्षेप केला. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून आज त्याबाबत महत्त्वपूर्ण सुनावणी होत आहे. याच पार्श्वभूमीवर देशभरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

VIDEO : काय आहे अयोध्येचा वाद? जाणून घ्या थोडक्यात

First Published: Nov 9, 2019 10:22 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading