अयोध्या प्रकरण: देशभरात कडेकोट सुरक्षा; सोशल मीडियावरही करडी नजर

अयोध्या प्रकरण: देशभरात कडेकोट सुरक्षा; सोशल मीडियावरही करडी नजर

सगळ्या देशाचं लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणावर आज सुप्रीम कोर्ट आपला ऐतिहासिक निकाल देणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 9 नोव्हेंबर : सगळ्या देशाचं लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणावर आज(9 नोव्हेंबर)सुप्रीम कोर्ट आपला ऐतिहासिक निकाल देणार आहे. सकाळी 10:30 पासून कोर्टात निकालाचं वाचन करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर देशभरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. देशातील हा ऐतिहासिक निकाल असून सर्व राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कुठे आहे कशी सुरक्षा व्यवस्था...

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबई सह अनेक मोठया शहरात कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. संवेदनशील भागांवर जास्त लक्ष केंद्रित करण्यात आलं असून पोलिसांची अधिक कुमक सुमारे 50 हजार तैनात करण्यात आले आहे. पोलिसांची सोशल मीडियावरही करडी नजर राहणार आहे. तुम्ही काय लिहिता आणि काय पोस्ट करता यावरही लक्ष असेल. अफवा किंवा वादग्रस्त पोस्ट पसरवणाऱ्या अथवा लिहिणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. रेल्वे स्थानकांवर अलर्ट जारी करण्यात आला असून पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.

निकालाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये पोलिसांची अधिक कुमक तैनात करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शांतता, संयम राखण्याचं आवाहन ट्विटरच्या माध्यमातून केलं आहे. अयोध्या आणि उत्तर प्रदेशातील अनेक भागात ड्रोनच आणि हेलिकॉप्टरने नजर ठेवली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयात तीन चक्रीय सुरक्षा असेल . दिल्ली पोलिस, राजस्थान आर्म्स पोलिस, सीआरपीएफची सुरक्षा पुरवतील. दिल्ली, अयोध्या, उत्तर प्रदेशसह देशभरातील अनेक संवेदनशील ठिकाणांना इंटरनेट बंद करण्यात येणार आहे.

उत्तर प्रदेशात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. अतिगर्दी, धार्मिक स्थळांवरचा बंदोबस्तही वाढवण्यात आला. अयोध्येतील सर्व शाळा 11 नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. देशातील बहुतांश शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.दरम्यान अयोध्येत सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात असली तरी कोणतंही भितीचं वातावरण नाही असं अयोध्येच्या नागरिकांचं म्हणणं आहे

अहमदाबादमध्ये दर्ग्यामध्ये दुआचं आयोजन करण्यात आलं होतं. देशाच्या शांतता, बंधुभाव,एकता आणि अखंडतेसाठी यावेळएस प्रार्थना करण्यात आली.

सुप्रीम कोर्टाचा निर्णय़ सर्वांनी स्वीकारला पाहिजे असं मत ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केलं. खटला संवेदनशील असल्यानं सोशल मीडियावर पसरवल्या जाणा-या अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन त्यांनी जनतेला केलं आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: November 9, 2019, 7:52 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading