अयोध्या बनली पोलिसांची छावणी, 'ब्लॅक कॅट' कमांडोही तैनात!

पोलिसांचे वरिष्ठ अधिकारीही अयोध्येत दाखल झाले आहेत. पोलिस आणि ब्लॅक कॅट कामांडोंबरोबरच राज्य राखीव दलाच्या 48 कंपन्याही अयोध्या आणि फैजाबादमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत.

News18 Lokmat | Updated On: Nov 23, 2018 07:48 PM IST

अयोध्या बनली पोलिसांची छावणी, 'ब्लॅक कॅट' कमांडोही तैनात!

अयोध्या, ता.23 नोव्हेंबर : अयोध्येत अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा वातावरण तापलंय. 25 नोव्हेंबरला म्हणजे रविवारी शिवसेना आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यक्रम असल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनानं कडक सुरक्षा व्यवस्था ठेवलीय. शहरातल्या महत्वाच्या ठिकाणी ब्लॅक कॅट कमांडोही तैनात करण्यात आले असून शहरात 144 वं कलम लावण्यात आलंय. एक लाखांपेक्षा जास्त लोक अयोध्येत येण्याची शक्यता आहे.


पोलिसांचे वरिष्ठ अधिकारीही अयोध्येत दाखल झाले आहेत. पोलिस आणि ब्लॅक कॅट कामांडोंबरोबरच राज्य राखीव दलाच्या 48 कंपन्याही अयोध्या आणि फैजाबादमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. गप्तचर विभागाचे अधिकारीही साध्या वेशात तैनात असून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा खास मंत्रालयातून घेतला जात आहे. शिवसेनेचे अनेक दिग्गज नेते अयोध्येत पोहोचले असून उद्धव ठाकरे यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी त्यांनी कंबर कसलीय.


काय म्हणाले संजय राऊत?

Loading...


शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 25 नोव्हेंबरला अयोध्येत जाणार आहेत. या दौऱ्याच्या तयारीसाठी शिवसेनेचे दिग्गज नेते आधीच अयोध्येत दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे हे जाहीर सभा न घेता संतांचे आशीर्वाद आणि शरयू नदीची आरती करणार आहेत असं शिवसेनेने जाहीर केलंय.


राऊत यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन भाजपला टोला लगावला. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनात आणलं तर राम मंदिर बांधणं काही अवघड नाही. भाजपने संसदेत कायदा करावा त्याला शिवसेना तर पाठिंबा देईलच त्याच बरोबर अन्य पक्षांचे खासदारही पाठिंबा देतील.


उत्तरप्रदेश आणि केंद्रातही भाजपचेच सरकार आहे त्यामुळं असा कायदा करणं अवघड नाही. भाजप असं का करत नाही ते माहित नाही असंही ते म्हणाले. बाबरी ढाचा शिवसेनेने पाडला त्यामुळं मंदिर बांधणं आम्हाला अवघड नाही असंही ते म्हणाले.


25 नोव्हेंबरलाच विश्व हिंदू परिषदेनेही अयोध्येत हुंकार रॅलीचं आयोजन केलंय. त्यामुळं शिवसेना आणि विश्व हिंदू परिषद शक्तीप्रदर्शन करणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनानही जोरदार तयारी केली असून सुरक्षेत वाढ केलीय.

VIDEO : 'मर्द हो ना, चेहरा उपर करो', महिला चोराला अमानुष मारहाण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 23, 2018 07:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...