अयोध्या राम जन्मभूमी-बाबरी मशीद वाद: आजच्या सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष

अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मशीद जमीन वादावरील सुनावणी आज पूर्ण होण्याची शक्यता आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 16, 2019 08:13 AM IST

अयोध्या राम जन्मभूमी-बाबरी मशीद वाद: आजच्या सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष

नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर: अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मशीद जमीन(Ram Janm Bhoomi Babri Masjid) वादावरील सुनावणी आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी दोन्ही पक्षांच्या युक्तीवादानंतर सर्वोच्च न्यायालय (supreme court)निर्णय सुरक्षित ठेवू शकतो. गेल्या 39 दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयातील घटनात्मक पीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई (Chief Justice Ranjan Gogoi) यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या पीठासमोर ही सुनावणी सुरु आहे. या सुनावणीसाठी न्यायालयाने निश्चित केलेल्या तारखेच्या एक दिवस आधीच सुनावणी पूर्ण होत आहे. यासाठी न्यायालयाने 17 ऑक्टोबर ही तारीख निश्चित केली होती.

अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीचा आज 40 दिवस आहे. याआधी 39व्या दिवशी म्हणजे मंगळवारी हिंदू पक्षकारांचे वकील के.परासरन यांनी मशीदची निर्मिती ही एक ऐतिहासिक चूक असल्याचे म्हटले होते. मुस्लिम पक्षकारांनी केलेल्या युक्तीवादाला उत्तर देताना ते म्हणाले होते की, भारतात विजय मिळवल्यानंतर मुगल शासक बाबर(Mugal Emperor Babur)ने 433 वर्षांपूर्वी अयोध्येत प्रभू राम यांच्या जन्मस्थानावर मशीदीची निर्मिती करून ऐतिहासिक चूक केली होती. आता ही चूक सुधारण्याची गरज आहे.

अयोध्येत मुस्लीम अन्य कोणत्याही मशीदीमध्ये प्रार्थना करू शकतात. एकट्या अयोध्येत 55 ते 60 मशीदी आहेत. पण हिंदूंसाठी प्रभू राम यांचे जन्मस्थान आहे. जे आम्ही बदलू शकत नाही. या घटनापीठात सरन्यायाधीश गोगोई यांच्यासह न्या.एस.ए.बोबडे, न्या.डी.वाय.चंद्रचूड, न्या.अशोक भूषण, न्या. एस.ए.नजीर यांचा समावेश आहे.

न्यायालयाने विचारले अनेक प्रश्न

मंगळवारी झालेल्या सुनावणी दरम्यान मुस्लीमांचे वकील रजीव धवन यांनी आरोप केला होता की प्रश्न केवळ मलाच विचारले गेले हिंदू पक्षाला प्रश्नच विचारण्यात आले नाहीत. त्यावर न्यायालयाने परासरन यांना, अनेक प्रश्न विचारले. यानंतर सरन्यायाधीशांनी धवन यांनी विचारले की आम्ही हिंदू पक्षाला पुरेसे प्रश्न विचारले आहेत ना? न्यायालयाने परासरन यांना कायद्याचे पालन न करता अयोध्येतील 2.77 एकर वादग्रस्त जागेवरून मुस्लिमांना हटवण्यात आल्यावरून तसेच 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडण्यासंदर्भात प्रश्न विचारले.

Loading...

अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मशीद जमीन प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने 2010मध्ये निकाल दिला होता. उच्च न्यायालयाने तेव्हा 2.77 एकर जागा सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही आखाडी आणि राम लल्ला यांच्यात समान विभागून द्यावी असा निर्णय दिला होता. या निकालाच्या विरोधात 14 याचिका दाखल झाल्या होत्या.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी अंतिम टप्प्यात आल्याने अयोध्या जिल्ह्यात कलम 144 लागू करण्यात आले आहे. संपूर्ण जिल्ह्यात 13 ऑक्टोबरपासून कलम 144 लागू करण्यात आले असून ते 10 डिसेंबरपर्यंत लागू असेल.

डोळ्यादेखत कार जळून खाक, पाहा बर्निंग कारचा थरारक VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 16, 2019 08:13 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...