अयोध्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप याचिका फेटाळल्या; पुढची सुनावणी 23 मार्चला

सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात दाखल झालेल्या २० हस्तक्षेप याचिका फेटाळून लावल्या आहेत. यामध्ये सुब्रमण्यम स्वामी, श्याम बेनेगल, तिस्ता सेटलवाड, अपर्णा सेन यांचा देखील समावेश आहे.

Sachin Salve | Updated On: Mar 14, 2018 05:22 PM IST

अयोध्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप याचिका फेटाळल्या; पुढची सुनावणी 23 मार्चला

14 मार्च : बाबरी मशीद प्रकरणात सुप्रीम कोर्टाने बुधवारी महत्त्वपूर्ण निर्णय दिला. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात दाखल झालेल्या २० हस्तक्षेप याचिका फेटाळून लावल्या आहेत. यामध्ये सुब्रमण्यम स्वामी, श्याम बेनेगल, तिस्ता सेटलवाड, अपर्णा सेन यांचा देखील समावेश आहे.

या खटल्यात निर्मोही आखाडा, रामलल्ला आणि सुन्नी वक्फ मंडळ हे तीन पक्षकार असतील.

सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश दीपक मिश्रा, अशोक भूषण, एस. अब्दुल नजीर यांच्या बेंचसमोर ही सुनावनी करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टात अयोध्याप्रकरणात ३२ नामांकित मंडळींनी याचिका दाखल केली होती. पण त्यातल्या सर्व हस्तक्षेप याचिका सुप्रीम कोर्टाकडून फेटाळण्यात आल्या आहेत.

भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी देखील अयोध्या प्रकरणात रिट पिटीशन दाखल केली होती. या वादावर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र, या खटल्यामध्ये जे वादी प्रतिवादी आहेत ते वगळता अन्य कुणाचीही लुडबूड खपवून घेतली जाणार नाही असा इशाराच कोर्टाने दिला आहे. त्यामुळे या खटल्याशी संबंधित पक्षकार वगळता अन्य जणांना या प्रकरणातून बाहेर काढण्यात आले आहे.

त्यामुळे या संबंधिची पुढची सुनावणी आता 23 मार्चला होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 14, 2018 09:12 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close