अयोध्येतील राम मंदिराच्या निर्मितीमध्ये आणखी एक अडथळा, IIT इंजिनिअर्सची घेणार मदत

अयोध्येतील राम मंदिराच्या निर्मितीमध्ये आणखी एक अडथळा, IIT इंजिनिअर्सची घेणार मदत

अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिराच्या (Ram Temple) निर्मितीमध्ये नवा अडथळा निर्माण झाला आहे. मंदिराच्या पायाखाली शरयू नदीच्या पाण्याचा प्रवाह मंगळवारी सापडला अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

  • Share this:

अयोध्या, 31 डिसेंबर : अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिराच्या (Ram Temple) निर्मितीमध्ये नवा अडथळा निर्माण झाला आहे. मंदिराच्या पायाखाली शरयू नदीच्या पाण्याचा प्रवाह मंगळवारी सापडला अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या कारणांममुळे मंदिराच्या निर्मितीमध्ये अडचण निर्माण होऊ शकते. या विषयावर मंदिर ट्रस्ट निर्माण समितीनं IIT इंजिनिअर्सची मदत मागितली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच मंदिराच्या नियोजित खांबाच्या उभारणीमध्ये अडथळा निर्माण झाला होता.

राम मंदिराच्याच्या पायाखाली शरयू नदीचा प्रवाह आढळल्यानं नियोजित मॉडेलमध्ये बदल कराना लागणार आहे. पंतप्रधानांचे मुख्य सचिव नूपेंद्र मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या बैठकीत या प्रश्नावर चर्चा करण्यात आली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

खांबाच्या निर्मितीमध्येही आला होता अडथळा

राम मंदिराचा पाया असलेल्या जमिनीखाली वाळूमिश्रीत माती सापडली आहे. ही माती मंदिर निर्मितीसाठी योग्य नाही. हे भव्य मंदिर अनेक मोठ्या दगडांना आकार देऊन उभारलं जाणार आहे. त्यामुळे या दगडांना पेलू शकेल अशी माती मंदिराच्या ठिकाणी असणे आवश्यक आहे. पायाखाली सापडलेली माती त्यासाठी योग्य नाही, असं तज्ज्ञांचं मत आहे. या बांधकामाची चाचणी करत असताना दगड अचानक खाली घसरला. त्यानंतर केलेल्या पाहणीतून ही बाब समोर आली होती. याविषयावर देखील IIT इंजिनिअर्स आणि देशभरातील तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे.

(हे वाचा-चीनची मुजोरी! शेतकरी आंदोलनाआडून भारतातील चिनी एजंट्स लढतायंत अप्रत्यक्ष युद्ध)

प्रस्तावित राम मंदिरामध्ये 1200 खांब उभारण्याची योजना आहे. हे स्तंभ उभारण्यासाठी लागणारे पिलर्स उभारण्यापूर्वी 12 नमुना खांब आयआयटी मद्रासच्या टीमनं बनवले होते. या खांबांवर वजन टाकण्यात आलं त्यावेळी त्याच्या पायाशी असलेली जमीन काही इंच दबली गेली. त्यावेळी ती माती वाळूममिश्रित असल्याचं निष्पन्न झाले.

Published by: News18 Desk
First published: December 31, 2020, 12:55 PM IST
Tags: ram temple

ताज्या बातम्या