अयोध्येत गुढीपाडव्यापासून ‘रामलल्ला’ नव्या जागेत, असं असेल राम मंदिर

अयोध्येत गुढीपाडव्यापासून ‘रामलल्ला’ नव्या जागेत, असं असेल राम मंदिर

24 मार्चला या मूर्ती हलविण्यात येणार असून 25 मार्च म्हणजेच गुढीपाडव्यापासून या मूर्तींचं दर्शन भाविकांना घेता येणार आहे.

  • Share this:

अयोध्या 07 मार्च : केंद्र सरकारने अयोध्येत राम मंदिर बांधकामासाठी ट्रस्टची स्थापना केल्यानंतर कामाला वेग आलाय. ट्रस्टची दुसरी बैठक आज झाली त्यात महत्वाचा निर्णय घेण्यात आला. राम मंदिराच्या बांधकामाला लवकरच सुरुवात होणार असून त्यासाठी कामाला सुरुवात झालीय. याचाच एक भाग म्हणून राम जन्मभूमी स्थानावर सध्या ज्या मूर्ती आहेत त्या रामलल्लांचं स्थानांतर करण्यात येणार आहे. या मूर्ती तात्पुरत्या स्वरुपात नव्या जागेत स्थानांतरीत करण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी दिलीय. 24 मार्चला या मूर्ती हलविण्यात येणार असून 25 मार्च म्हणजेच गुढीपाडव्यापासून या मूर्तींचं दर्शन भाविकांना घेता येणार आहे.  जवळपास गेल्या 70 वर्षांपासून रामजन्मभूमी स्थानावर या मूर्ती विराजमान आहेत. या मूर्ती नव्या जागेत स्थानांतरीत करणं यालाच भव्य राम मंदिराच्या बांधकामाची सुरुवात समजली जाते.

सुप्रीम कोर्टाच्या ऐतिहासिक निर्णयानंतर सरकारने तयार केलेल्या या स्ट्रस्टमध्ये 15 सदस्य आहेत. त्यात माजी सनदी अधिकारी, अयोध्या आंदोलनातले अध्यात्मिक नेते आणि काही संत मंडळींचा समावेश आहे. 2022-2023 पर्यंत राम मंदिराचं बांधकाम पूर्ण व्हावं असा या ट्रस्टचा प्रयत्न राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. राम मंदिरासाठी विश्व हिंदू परिषदेने गेली काही दशकं मंदिराचे खांब कोरण्यासाठी खास कार्यशाळा उभारली होती. तिथे मंदिराचे अनेक खांब तयार करण्यात आले आहेत. त्याचाच वापर मंदिराच्या बांधकामासाठी करण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 फेब्रुवारीला लोकसभेत एक अतिशय महत्त्वाची घोषणा केली होती. अयोध्येत भव्य आणि दिव्य मंदिर बांधण्यासाठी सुप्रिम कोर्टाच्या निर्देशानुसार एका ट्रस्टची स्थापना करण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. श्री रामजन्मभूमी तिर्थक्षेत्र ट्रस्ट असं त्या ट्रस्टचं नाव असून सर्व 67 एकर जमीन या ट्रस्टला दिली जाणार आहे.

पिक्चर अभी बाकी है! शिवसेनेने रिलीज केला नवा VIDEO

त्याचबरोबर मशिद बांधण्यासाठी सुन्न वक्फ बोर्डाला 5 एकर जमीन देण्यासाठी कार्यवाही सुरु झाली असल्याचंही त्यांनी सांगितलं. प्रश्नोत्तराचा तास सुरु होण्यापूर्वी पंतप्रधानांनी हे निवेदन केलं. पंतप्रधान म्हणाले, राम हा देशातल्या प्रत्येकाच्या मनात आणि कणाकणात आहे. रामजन्मभुमीवर भगवान रामांचं भव्य आणि दिव्य मंदिर बांधण्यासाठी सगळ्यांनी संकल्प केला पाहिजे.

शिक्षिकेनेच काढले चिमुकलीला चिमटे, मुंबईतल्या Preschoolमधला धक्कादायक प्रकार

पंतप्रधान पुढे म्हणाले, अयोध्येचा निकाल आल्यानंतर देशाविसायांनी अतिशय प्रगल्भतेचं दर्शन घडवलं होतं. त्यामुळे सगळ्या देशवासियांना मी धन्यवाद देतो. देशातल्या सर्व समाजघटकांना सोबत घेऊन जाण्याचं माझ्या सरकारचं धोरण आहे. त्यानुसार सरकारची वाटचाल सुरू असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

 

 

First published: March 7, 2020, 2:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading