अयोध्येत भव्य राम मंदिरासाठी उद्धव ठाकरेंनी दिली 1 कोटींची देणगी

अयोध्येत भव्य राम मंदिरासाठी उद्धव ठाकरेंनी दिली 1 कोटींची देणगी

'शिवसेनेने अयोध्या आंदोलनात सहभाग घेतला होता. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही सक्रिय पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्या सर्व आठवणी ताज्या झाल्या आहेत.'

  • Share this:

अयोध्या 07 मार्च : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अयोध्येत रामल्लांचं दर्शन घेतलं. उद्धव ठाकरे यांचा हा तिसरा अयोध्या दौरा आहे. अयोध्येत पोहोचल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी महत्त्वाची घोषणा केली. अयोध्येत प्रस्तावित राम मंदिरासाठी शिवसेनेच्या ट्रस्टकडून 1 कोटी रुपयांची देणगी उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली. मंदिर बांधकामात फुल नाही तर फुलाची पाकळी या विचाराने अतिशय विनम्रपणे हे योगदान देत असल्याचं त्यांनी जाहीर केलं. मुख्यमंत्री म्हणून नाही, महाराष्ट्र सरकारच्या वतीने नाही तर ही देणगी ट्रस्टच्या वतीने देत असल्याचं त्यांनी सांगितलं. माझी ही तिसरी अयोध्या भेट असून प्रत्येक दौऱ्यानंतर आम्हाला यश मिळालं असंही त्यांनी सांगितलं.

शिवसेनेने अयोध्या आंदोलनात सहभाग घेतला होता. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही सक्रिय पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्या सर्व आठवणी ताज्या झाल्या आहेत असंही त्यांनी सांगितलं. शिवसेनेने भाजपला सोडलं हिंदुत्वाला नाही असंही ते म्हणाले. यापुढेही मी अयोध्येत येत राहीन अशी घोषणाही त्यांनी केली.

दरम्यान,  केंद्र सरकारने अयोध्येत राम मंदिर बांधकामासाठी ट्रस्टची स्थापना केल्यानंतर कामाला वेग आलाय. ट्रस्टची दुसरी बैठक आज झाली त्यात महत्वाचा निर्णय घेण्यात आला. राम मंदिराच्या बांधकामाला लवकरच सुरुवात होणार असून त्यासाठी कामाला सुरुवात झालीय. याचाच एक भाग म्हणून राम जन्मभूमी स्थानावर सध्या ज्या मूर्ती आहेत त्या रामलल्लांचं स्थानांतर करण्यात येणार आहे. या मूर्ती तात्पुरत्या स्वरुपात नव्या जागेत स्थानांतरीत करण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी दिलीय.

हे वाचा -  शिक्षिकेनेच काढले चिमुकलीला चिमटे, मुंबईतल्या Preschoolमधला धक्कादायक प्रकार

24 मार्चला या मूर्ती हलविण्यात येणार असून 25 मार्च म्हणजेच गुढीपाडव्यापासून या मूर्तींचं दर्शन भाविकांना घेता येणार आहे.  जवळपास गेल्या 70 वर्षांपासून रामजन्मभूमी स्थानावर या मूर्ती विराजमान आहेत. या मूर्ती नव्या जागेत स्थानांतरीत करणं यालाच भव्य राम मंदिराच्या बांधकामाची सुरुवात समजली जाते.

हे वाचा -  पिक्चर अभी बाकी है! शिवसेनेने रिलीज केला नवा VIDEO

सुप्रीम कोर्टाच्या ऐतिहासिक निर्णयानंतर सरकारने तयार केलेल्या या स्ट्रस्टमध्ये 15 सदस्य आहेत. त्यात माजी सनदी अधिकारी, अयोध्या आंदोलनातले अध्यात्मिक नेते आणि काही संत मंडळींचा समावेश आहे. 2022-2023 पर्यंत राम मंदिराचं बांधकाम पूर्ण व्हावं असा या ट्रस्टचा प्रयत्न राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. राम मंदिरासाठी विश्व हिंदू परिषदेने गेली काही दशकं मंदिराचे खांब कोरण्यासाठी खास कार्यशाळा उभारली होती. तिथे मंदिराचे अनेक खांब तयार करण्यात आले आहेत. त्याचाच वापर मंदिराच्या बांधकामासाठी करण्यात येणार आहे.

 

 

 

First published: March 7, 2020, 2:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading