राम मंदिरासाठी लागणार दर्जेदार 'पिंक स्टोन', पण राजस्थान सरकारने खाणीचे काम थांबवले

राम मंदिरासाठी लागणार दर्जेदार 'पिंक स्टोन', पण राजस्थान सरकारने खाणीचे काम थांबवले

पिंक स्टोन हा मार्बलपेक्षाही स्वच्छ आणि दिसायला सुंदर आहे. या दगडाचे आयुष्य हे जवळपास 1000 वर्ष इतकी आहे.

  • Share this:

अयोध्या, 15 सप्टेंबर : राजस्थान काँग्रेस सरकारने बंसी पहाडपूरमधील गुलाबी दगड (Pink Stone) खाणीवर बंदी आणली आहे. अयोध्येच्या राम मंदिर (Ram Mandir) निर्माणासाठी हेच  पिंक स्टोन वापरले जाणार होते.  अयोध्येच्या कार्यशाळेत राजस्थानच्या बंसी पहाडपूर येथून आलेले पिंक स्टोनची पाहणी करून राम मंदिर निर्माणासाठी योग्य असल्यामुळे वापरण्यात येणार आहे.

राम मंदिरासाठी जवळपास 3 लाख घनफूट दगडांची आवश्यकता आहे. आतापर्यंत 1 लाख घनफूट दगडांची व्यवस्था करण्यात आली आहे.  जवळपास 20 हजार घनफूट दगडं हे रामसेवक पुरममध्ये ठेवलेले आहे. आता उरलेले दगडं हे बंसी पहाडपूर येथील खाणीतून अयोध्येसाठी मागवण्यात आले होते. पण आता काँग्रेस सरकारने या खाणीचे काम थांबवले आहे. त्यामुळे राम मंदिराच्या कामाला ब्रेक लागण्याची शक्यता  आहे.

परंतु, या मुद्द्यावर राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महामंत्री चंपत राय यांनी या प्रकरणावर वेळ आल्यावर योग्य ती माहिती दिली जाईल, अशी प्रतिक्रिया दिली. विशेष म्हणजे, मागील काही दिवसांमध्ये  राजस्थान मायनिंग विभाग,  हरातपूर जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी बंसी पहाडपूरमध्ये अवैध्य खाण उत्खनन होत असल्याच्या तक्रारी मिळाल्या होत्या. कोणत्याही परवानगीशिवाय उत्खनन सुरू होते, त्यामुळे कारवाई करण्यात आली अशी माहिती जिल्हाधिकारी नथमल दिदेल यांनी दिली.

अयोध्येत राम मंदिर निर्माणाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. राम मंदिर उभारण्यासाठी पायाभरणी कामाची चाचणी सुरू झाली आहे. कार्यशाळेत पिंक स्टोन ठेवण्यात आले आहे. ते राम जन्मभूमी परिसरात कसे आणार याची रणनीती आखली जात आहे. त्याच दरम्यान, राजस्थानमधून ही धक्कादायक बातमी आहे. त्यामुळे राजस्थानमधून येणाऱ्या पिंक स्टोनचा पुरवठा तुर्तास थांबला आहे.

राम मंदिर कार्यशाळेचे  मॅनेजर अन्नू भाई सोमपुरा यांनी सांगितले की, राम मंदिर निर्माणसाठी 1990 मध्ये कार्यशाळा स्थापन करण्यात आली. तेव्हापासून  बंसी पहाडपूर राजस्थान येथून दगडं मागवण्यात येत होते.

तुर्तास कार्यशाळा बंद आहे. कारण अजून एक लाख घनफुट दगडाची पाहणी करून निश्चित केले आहे. आता जी दगडं लागणार आहे ती राजस्थानमधून मागवावी लागणार आहे. तसंच सध्या दगडांची कमतरता नाही, असंही त्यांनी स्पष्ट केले. पण, अद्याप राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

पिंक स्टोनचे वैशिष्ट्य

राजस्थान येथील बंसी पहाडपूर येथील पिंक स्टोन पत्थर राम मंदिर निर्माणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. पिंक स्टोन हा मार्बलपेक्षाही स्वच्छ आणि दिसायला सुंदर आहे. या दगडाचे आयुष्य हे जवळपास 1000 वर्ष इतकी आहे. राजस्थानातील पिंक स्टोन दगडं ही पक्के आणि उत्तम दर्जाची आहे. त्यामुळे ते राम मंदिरासाठी वापरणार आहे.

Published by: sachin Salve
First published: September 15, 2020, 8:50 AM IST

ताज्या बातम्या