जाणून घ्या ऐतिहासिक अयोध्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातील महत्त्वाचे मुद्दे

शिया वक्फ बोर्ड आणि निर्मोही आखाड्याचा दावा फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणावर निकाल दिला आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 9, 2019 11:23 AM IST

जाणून घ्या ऐतिहासिक अयोध्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातील महत्त्वाचे मुद्दे

नवी दिल्ली, 09 नोव्हेंबर : ऐतिहासिक अयोध्या प्रकरणाच्या निकालपत्राचे वाचन साडेदहा वाजता सुरू करण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने याची सुनावणी केली. त्यानंतर आज त्याच्या निकालपत्रावर या सर्व न्यायाधीशांनी सह्या केल्या.

वादग्रस्त जागेवर शिया वक्फ बोर्डाचा मालकी हक्काचा दावा सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. तसेच याठिकाणी असलेलं बांधकाम गैर इस्लामिक होतं असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. शिया वक्फ बोर्डाची याचिका पाचही न्यायाधीशांनी फेटाळली. सुन्नी वक्फ बोर्ड आणि राम लाल्ला  विराजमान यांचे दावे निकाली काढले जातील आणि दिलासा दिला जाईल असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं.

मंदिर आणि मशिदीच्या बांधकामामध्ये 400 वर्षांचं अतंर आहे. मुस्लीम त्या जागेला नमाज पठणाचे स्थळ मानतात तर त्या जागेवर प्रभू रामचंद्रांचा जन्म तिथं झाल्याची हिंदूंची श्रद्धा आहे असंही मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं.

अयोध्या प्रकरणात हिंदू पक्षाने अनेक ऐतिहासिक दस्ताऐवज सादर केले. हिंदूंनी केलेला दावा खोटा नाही. रामलल्लाचा ऐतिहासिक ग्रंथांमध्ये उल्लेख. याशिवाय चौथरा आणि सिता की रसोई याठिकाणी असल्याचंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. हिंदूंनी त्या जागेचे महत्त्व दर्शविण्यासाठी अनेक ऐतिहासिक रेकॉर्ड आणि गॅझेटियर रेकॉर्ड दिले.

केवळ विश्वास आणि श्रद्धा यांच्या जोरावर मालकी हक्क सांगता येणार नाही. सुन्नी वक्फ बोर्डाचा खटला कायम ठेवता येतो. परंतु प्रतिकूल ताबा मिळवण्याचा हक्क मुस्लिम सांगू शकत नाहीत. बाह्य अंगणात हिंदूंचा  ताबा आहे. मुस्लीमांना पर्यायी जागा देण्यात येणार असून काही अटी शर्तीच्या आधारावर हिंदूंना  जमीन  मिळेल सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे.

Loading...

PHOTOS निकालापूर्वीच मंदिराची तयारी पूर्ण; असं दिसेल अयोध्येचं राम मंदिर

एएसआयच्या अहवालाबाबतही सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वाची टिप्पणी केली. हा अहवाल अंदाज किंवा फक्त एक अंदाज म्हणून नाकारता येणार नाही. एएसआय क्रेडेन्शियल संशयाच्या पलीकडे आहे आणि याचा शोध दुर्लक्षित करता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं.

अयोध्या प्रकरणाबाबत पंडित नेहरूंनी तेव्हा जे सांगितलं ते आज घडतंय

एएसआयच्या अहवालात मूलभूत रचना विशिष्ट मंदिर असल्याचे म्हटले गेले नाही असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं. मीर बाँकीनं बाबरच्या काळात मशिद बांधली. याशिवाय एएसआयने इदगाहचा उल्लेख केलेला नाही. खोदकामात इस्लामिक ढाचा असल्याचे पुरावे आढळले नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं.

काय होता अलाहाबाद न्यायालयाचा निकाल ज्यावर सुप्रीम कोर्टात धावले सर्व पक्षकार?

मुस्लिमांनी वादग्रस्त जमिनीचा संपूर्ण ताबा कधीही गमावला नाही याचा पुरावा आहे. तसेच मुस्लिमांनी नमाज बंद केला नाही किंवा संरचना सोडली नव्हती असंही निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाने काय दिला निकाल ; LIVE UPDATE

काही अटी शर्तीच्या आधारावर हिंदूंना  जमीन  मिळेल

बाहेरचा चौथरा,राम चौथरा,सीता की रसोईत पूजा होई- कोर्ट

जमीन संपादनाआधी तिथं मुस्लीम नमाज पढत होते- कोर्ट

आतील भागात नेहमी पूजा होत असे- कोर्ट

मशिद आणि कब्रस्तान असल्याचा मुस्लीम पक्षांचा दावा

सुन्नी वक्फ बोर्डाचा दावा विचार करण्यासारखा- कोर्ट

इथं 'सीता की रसोई' असल्याची हिंदूंची श्रद्धा-कोर्ट

मंदिर पाडून मशीद बनवल्याचा उल्लेख नाही- कोर्ट

एका रात्री मूर्ती ठेवली असा मुस्लिम पक्षाचा दावा- कोर्ट

आस्था आणि विश्वासावर कोणताही वाद होऊ शकत नाही- कोर्ट

हे रामाचं जन्मस्थान अशी हिंदूंची श्रद्धा-कोर्ट

आधीचं बांधकाम गैरइस्लामिक होतं- कोर्ट

वादग्रस्त जागेवर आधी बांधकाम होतं- कोर्ट

मोकळ्या जागेवर मशीद बांधली गेली नव्हती- कोर्ट

निर्मोही आखाड्याचा दावा फेटाळला

श्रद्धा आणि भावनेपेक्षा कोर्टाचं स्थान वरचं -कोर्ट

मध्ये दोन मूर्ती ठेवण्यात आल्या-कोर्ट

1949मध्ये दोन मूर्ती ठेवण्यात आल्या-कोर्ट

अयोध्याप्रकरणाचा आज सुप्रीम कोर्टात ऐतिहासिक निर्णय

निकाल वाचनाला काही वेळातच सुरूवात

राममंदिरासाठी 3 महिन्यात ट्रस्ट स्थापन करा- कोर्ट

वादग्रस्त जागा रामलल्लाचीच -कोर्ट

केंद्राला ट्रस्ट स्थापन करण्याचे कोर्टाचे आदेश

सुन्नी वक्फ बोर्डाला 5 एकर जागा द्यावी - कोर्ट

वादग्रस्त 5 एकर जागा हिंदूंना मिळणार-कोर्ट

आतील भाग अद्यापही वादग्रस्त आहे - कोर्ट

मुस्लिमांना पर्यायी जागा देणार - कोर्ट

हिंदू पक्षानं बाहेरच्या जागेवर दावा सिद्ध केला - कोर्ट

प्राचीन यात्रेकरूंनी रामजन्मभूमीचा उल्लेख केलाय-कोर्ट

लोक मशिदीच्या घुमटालाच रामजन्मस्थान मानतात- कोर्ट

प्राचीन यात्रेकरूंनी रामजन्मभूमीचा उल्लेख केलाय- कोर्ट

सुन्नी वक्फ बोर्ड दावा सिद्ध करू शकले नाहीत- कोर्ट

कोण आहेत अयोध्या प्रकऱणाचा ऐतिहासिक निकाल देणारे 5 न्यायाधीश?

VIDEO : काय आहे अयोध्येचा वाद? जाणून घ्या थोडक्यात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 9, 2019 11:23 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...