Ayodhya Verdict Result ट्रस्ट स्थापन करून राम मंदिर उभारण्याचे सरकारला आदेश, अयोध्या निकालातील 15 मोठे मुद्दे

Ayodhya Verdict Result ट्रस्ट स्थापन करून राम मंदिर उभारण्याचे सरकारला आदेश, अयोध्या निकालातील 15 मोठे मुद्दे

देशातील सर्वात मोठ्या आणि जुन्या अशा अयोध्या प्रकरणावर ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला.

  • Share this:

नवी दिल्ली, 09 नोव्हेंबर : देशातील सर्वात मोठ्या आणि जुन्या अशा अयोध्या प्रकरणावर ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने निर्मोही आखाडा आणि शिया वक्फ बोर्डाच्या याचिका फेटाळून लावल्या.

अयोध्येतील रामजन्मभूमी न्यासाला वादग्रस्त जमीन देण्यात आली असून मुस्लीमांना 5 एकर जमीन देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. याशिवाय सर्वोच्च न्यायालयाने सरकारला ट्रस्ट स्थापन करून राम मंदिर उभारण्याचे आदेश दिले आहेत.

वादग्रस्त जागेवर शिया वक्फ बोर्डाचा मालकी हक्काचा दावा सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. तसेच याठिकाणी असलेलं बांधकाम गैर इस्लामिक होतं असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. शिया वक्फ बोर्डाची याचिका पाचही न्यायाधीशांनी फेटाळली. सुन्नी वक्फ बोर्ड आणि राम लाल्ला  विराजमान यांचे दावे निकाली काढले जातील आणि दिलासा दिला जाईल असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं.

सर्वोच्च न्यायालयाने काय दिला निकाल ; LIVE UPDATE

जमीन संपादनाआधी तिथं मुस्लीम नमाज पढत होते- कोर्ट

सुन्नी वक्फ बोर्डाचा दावा विचार करण्यासारखा- कोर्ट

मंदिर पाडून मशीद बनवल्याचा उल्लेख नाही- कोर्ट

एका रात्री मूर्ती ठेवली असा मुस्लिम पक्षाचा दावा- कोर्ट

1949मध्ये दोन मूर्ती ठेवण्यात आल्या-कोर्ट

आधीचं बांधकाम गैरइस्लामिक होतं- कोर्ट

मोकळ्या जागेवर मशीद बांधली गेली नव्हती- कोर्ट

निर्मोही आखाड्याचा दावा फेटाळला

राममंदिरासाठी 3 महिन्यात ट्रस्ट स्थापन करा- कोर्ट

वादग्रस्त जागा रामलल्लाचीच -कोर्ट

सुन्नी वक्फ बोर्डाला 5 एकर जागा द्यावी - कोर्ट

वादग्रस्त जागा हिंदूंना मिळणार-कोर्ट

काही अटी शर्तीच्या आधारावर हिंदूंना  जमीन  मिळेल

मुस्लिमांना पर्यायी जागा देणार - कोर्ट

हिंदू पक्षानं बाहेरच्या जागेवर दावा सिद्ध केला - कोर्ट

प्राचीन यात्रेकरूंनी रामजन्मभूमीचा उल्लेख केलाय- कोर्ट

कोण आहेत अयोध्या प्रकऱणाचा ऐतिहासिक निकाल देणारे 5 न्यायाधीश?

VIDEO : काय आहे अयोध्येचा वाद? जाणून घ्या थोडक्यात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 9, 2019 11:48 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading