अयोध्येच्या मशिदीला मिळणार 1857 च्या लढ्यातल्या सैनिकाचं नाव

अयोध्येच्या मशिदीला मिळणार 1857 च्या लढ्यातल्या सैनिकाचं नाव

अहमदुल्लाह शाह यांनी 1857च्या बंडात इंग्रजांविरुद्ध मोठा लढा देऊन अवध अर्थात अयोध्या जिंकून घेतलं होतं. अहमदुल्लाह शाह यांचा जन्म 1787 मध्ये झाला होता. इंग्रजांच्या विरोधात बंड केल्याने त्यांना 5 जून 1858 मध्ये ठार करण्यात आलं.

  • Share this:

अयोध्या, 25 जानेवारी : अयोध्येतील (Ayodhya) बाबरी मशीद (Babri Masjid) पाडल्यानंतर आता धन्नीपूर इथे पाच एकर जागेवर उभारण्यात येणारी नवीन मशीद ही इंग्रजांविरुद्ध भारतीयांनी केलेल्या 1857च्या बंडातील स्वातंत्र्य सैनिक अहमदुल्लाह शाह (Ahmadullah Shah) यांना समर्पित करण्यात येण्याची शक्यता आहे.

अहमदुल्लाह शाह यांनी 1857च्या बंडात इंग्रजांविरुद्ध मोठा लढा देऊन अवध अर्थात अयोध्या जिंकून घेतलं होतं. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तरप्रदेश सुन्नी वक्फ बोर्डाने (UP Sunni Waqf Board) स्थापन केलेल्या इंडो-इस्लामिक कल्चरल फाउंडेशनने (Indo Islamic Cultural Foundation -IICF) या वृत्ताची पुष्टी केली आहे. याआधी एखाद्या मुघल बादशहाचं नाव मशिदीला देण्याचा विचार ट्रस्टने केला होता, मात्र अनेक नावांवरील चर्चेनंतर अहमदुल्लाह शाह यांच्या नावावर एकमत झालं, शाह यांना मौलवी फैजाबादी म्हणून ओळखलं जात असे, असं इंडो-इस्लामिक कल्चरल फाउंडेशनच्या एका सदस्यानं सांगितलं.

(वाचा - कोरोना वॅक्सिनच्या नावाने होणाऱ्या फसवणुकीपासून सावधान; आधार-OTP शेअर करू नका)

थोर स्वातंत्र्य सैनिक अहमदुल्लाह शाह यांना अयोध्येतील मशीद अर्पण करण्याच्या प्रस्तावावर गांभीर्याने विचार करण्यात येत असल्याचं फाउंडेशनचे सचिव अतहर हुसेन यांनी सांगितलं. वेगवेगळ्या माध्यमातून आम्हाला शिफारसी आल्या असून, यावर चर्चा करून लवकरच निर्णय जाहीर केला जाईल, असंही हुसेन यांनी सांगितलं.

अहमदुल्लाह शाह यांचा जन्म 1787 मध्ये झाला होता. इंग्रजांच्या विरोधात बंड केल्याने त्यांना 5 जून 1858 मध्ये ठार करण्यात आलं. शाह यांनी अख्या अयोध्येला इंग्रजांविरुद्ध बंड करण्यासाठी प्रवृत्त केलं होतं. ब्रिटीश अधिकारी जॉर्ज मल्लेसन लिखित हिस्ट्री ऑफ इंडियन म्यूटिनी या पुस्तकात अहमदुल्लाह शाह यांचा पराक्रम आणि संघटन कौशल्य याबाबत उल्लेख आहे.

(वाचा - Gold Price Today: सोने दरात घसरण, चांदी वधारली; जाणून घ्या काय आहे आजचा भाव)

इतिहासकार राम शंकर त्रिपाठी यांनी अहमदुल्लाह शाह हे मुस्लीम असल्याने त्या काळात ते धार्मिक एकतेचे आणि अयोध्येतील गंगा-जमुना संस्कृतीचं प्रतीकही होते. अहमदुल्लाह शाह यांच्याबरोबर कानपूरमधून नानासाहेब आणि आराकानचे कुंवर सिंग यांनी या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता. शाह यांच्या 22व्या इन्फंट्री रेजिमेंटचं नेतृत्व सुभेदार घमंडी सिंग आणि सुभेदार उमराव सिंग यांनी केलं होतं, अशी माहितीही इतिहासकार राम शंकर त्रिपाठी यांनी दिली आहे.

Published by: Karishma Bhurke
First published: January 25, 2021, 6:35 PM IST
Tags: ayodhya

ताज्या बातम्या