रामजन्मभूमी-बाबरी प्रकरण : खटल्याचा निकाल अपेक्षित, अयोध्या जिल्ह्यात कलम 144 लागू!

रामजन्मभूमी-बाबरी प्रकरण : खटल्याचा निकाल अपेक्षित, अयोध्या जिल्ह्यात कलम 144 लागू!

उत्तर प्रदेशमधील अयोध्या जिल्ह्यात कलम 144 लागू करण्यात आले आहे.

  • Share this:

अयोध्या, 14 ऑक्टोबर: उत्तर प्रदेशमधील अयोध्या जिल्ह्यात कलम 144 लागू करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने 10 डिसेंबरपर्यंत कलम 144 लागू असेल असे सांगितले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रामजन्मभूमी संदर्भातील वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. ही सुनावणी सध्या अखेरच्या टप्प्यात पोहोचली आहे. त्यामुळेच जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे डीएम अनुज कुमार झा यांनी सांगितले. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाकडून निर्णय अपेक्षीत आहे. त्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच शांतता राखण्याच्या दृष्टीने कलम 144 लागू करण्यात आले.

17 ऑक्टोबर पूर्ण होणार सुनावणी

अयोध्या प्रकरणाची नियमीत सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. दसऱ्याच्या सुट्टीनंतर सोमवारी पुन्हा कोर्टाचे कामकाज सुरु होणार आहे. 6 ऑगस्टपासून सुरु झालेल्या सुनावणी दरम्यान मुस्लिम पक्ष 14 ऑक्टोबरपर्यंत त्यांची बाजू मांडणार आहेत. त्यानंतर 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी हिंदू पक्षाला उत्तर देण्याची संधी दिली जाणार आहे. या प्रकरणाची सुनावणी 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुरु आहे. 17 ऑक्टोबरनंतर सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता आहे.

17 नोव्हेंबरपर्यंत निकाल

पुढील महिन्यात 17 तारखेपर्यंत वादग्रस्त 2.77 एकर जागेसंदर्भात अंतिम निर्णय येण्याची शक्यता आहे. 17 नोव्हेंबर रोजी सरन्यायाधिश रंजन गोगोई निवृत्त होत आहे. न्या.गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली घटनापीठ या प्रकरणाची सुनावणी करत आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेली सुनावणी आणि सण यामुळे जिल्ह्यात कलम 144 लागू करण्यात आले आहे. या प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने 2010मध्ये निर्णय दिला होता. त्या निर्णयाविरुद्ध 14 याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या. यासर्व याचिकांवर एकत्र सुनावणी सध्या सुरू आहे. या घटनापीठात न्या.एस.ए.बोबडे, न्या.डी.वाय.चंद्रचूड, न्या.अशोक भूषण, न्या. एस.ए.नजीर यांचा समावेश आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने वादग्रस्त 2.77 एकर जागा चार भागात वाटली होती.

काय आहे कलम 144

भारतीय दंड संहिता कलम 144 नुसार, हे कलम लागू झाल्यानंतर संबंधित परिसरात 5 पेक्षा जास्त लोक एकत्र गोळा होऊ शकत नाहीत. शस्त्र बाळगण्यास बंदी घातली जाते. शांतता प्रस्थापित करण्यासाठी हे कलम लागू केले जाते. हे कलम जिल्हा किंवा एखाद्या पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात लागू केले जाते. या कलमाचे उल्लंघन केल्यास एक वर्षापर्यंत कैद होऊ शकते.

दोन राजकीय पैलवानांची कथा, शरद पवार मुख्यमंत्र्यांना चितपट करणार?

Published by: Akshay Shitole
First published: October 14, 2019, 9:55 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading