Ayodhya Ram Mandir: फक्त भारतातच नाही तर 'या' देशातही आहे अयोध्या! रामायणाला राष्ट्रीय ग्रंथाचा दर्जा

Ayodhya Ram Mandir: फक्त भारतातच नाही तर 'या' देशातही आहे अयोध्या! रामायणाला राष्ट्रीय ग्रंथाचा दर्जा

Ayodhya Ram Mandir Bhumi Pujan: असे सांगितले जाते की दक्षिण-पूर्व आशियातील सध्याच्या थायलंडमध्ये एकेकाळी रामाचे राज्य होते. असा विश्वास आहे की राम हा चक्री घराण्याचा पहिला राजा होता.

  • Share this:

अयोध्या, 05 ऑगस्ट: रामनगरी अयोध्येत आज एक ऐतिहासिक घटना घडणार आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळा (Ayodhya Ram Mandir Bhumi Pujan) होणार आहे. मात्र अयोध्या फक्त भारतातच नाही तर थायलंडमध्ये ही आहे. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल, मात्र इतिहासात थायलंडमधील अयोध्येचा उल्लेख आहे. असे मानले जाते की, 15व्या शतकात थायलंडची राजधानी अयुत्थया होती. ज्याचा स्थानिक भाषेत अर्थ अयोध्या आहे. मात्र, याच दशकात बर्मी सैन्याच्या हल्ल्यात संपूर्ण शहर नष्ट झाले त्याचबरोबर मंदिरं आणि मूर्तीही नष्ट झाल्या.

असे सांगितले जाते की दक्षिण-पूर्व आशियातील सध्याच्या थायलंडमध्ये एकेकाळी रामाचे राज्य होते. असा विश्वास आहे की राम हा चक्री घराण्याचा पहिला राजा होता. थायलंडमध्ये आजही हा राजवंश आहे. जेव्हा बर्मा सैन्य येथून निघून गेले तेव्हा देशात सांस्कृतिक मुळे शोधण्याची मोहीम सुरू झाली. याच काळात रामायणाला (Ramayana) नवीन प्रतिष्ठा मिळू लागली.

वाचा-Live : पंतप्रधान मोदी अयोध्येत पोहोचले, काही क्षणांत सुरू होणार भूमिपूजन

रामायणाला राष्ट्रीय ग्रंथाचा दर्जा

रामायणाचे जे संस्करण आज येथे प्रसिद्ध आहे ते, राम प्रथमच्या संरचनेत रामलीला म्हणून विकसित केले गेले होते. राम प्रथमने त्याचे काही भाग पुन्हा लिहिले आहेत. महाकाव्य रामायणाला येथे राम कियान असे म्हणतात. थायलंडमध्ये, राजासह जवळजवळ संपूर्ण लोकसंख्या रामायणाला राष्ट्रीय ग्रंथ मानतात.

वाचा-भूमिपूजनाआधीच 'रामलल्ला' झाले अब्जाधीश! दानपेटीत जमा आहे इतकी रक्कम

थायलंडमध्येही आहे शरयू नदी

राम जन्मभूमि निर्माण न्यास ट्रस्टने थायलंडमध्ये सन 2018 साली भव्य राम मंदिर बांधण्याची घोषणा केली. याची सुरुवातही झाली आहे, हे मंदिर राम मंदिर सुप्रसिद्ध सोराय नदीच्या काठावर बांधले जात आहे. थायलंडची राजधानी असलेल्या बँकॉकला महेंद्र अयोध्या देखील म्हणतात. लोकांचा असा विश्वास आहे की इंद्राने तयार केलेली ही महान अयोध्या आहे. हेच कारण आहे की थायलंडचे सर्व राम (राजा) या अयोध्येत राहून काम करतात.

Published by: Priyanka Gawde
First published: August 5, 2020, 11:44 AM IST

ताज्या बातम्या