एक लाख 71 हजार दिव्यांनी उजळली अयोध्या नगरी

एक लाख 71 हजार दिव्यांनी उजळली अयोध्या नगरी

अयोध्या नगरी आज दिवाळी निमित्त तब्बल 1 लाख 71 हजार मातीच्या दिव्यांनी उजळली आहे.याप्रसंगी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल राम नाईकही उपस्थित होते.

  • Share this:

अयोध्या,18 ऑक्टोबर:श्रीरामचंद्राची अयोध्या नगरी आज  दिवाळी निमित्त तब्बल 1 लाख 71 हजार मातीच्या दिव्यांनी उजळली आहे.याप्रसंगी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल राम नाईकही उपस्थित होते.

शरयूच्या तीरावर श्रीराम नामाचा गजर करण्यात आला. श्रीराम आणि सीतेचा अभिनय करणारे नट राम सीतेच्या वेषात हेलीकॉप्टरमधून उतरले. यातून पुष्पक विमानातून राम-सीता परत आले असतील अशी कल्पना रंगवण्यात आली. दिवाळीच्या वेळी14 वर्षानंतर अयोध्येला परतला होता अशी इथल्या लोकांची मान्यता आहे. त्या आठवणीत अनेक लोकांनी घरोघरी दिवे लावले. अयोध्या नगर निगमची एकूण लोकसंख्याही 1 लाख 71 हजारच आहे.यावेळी अयोध्येने या देशाला रामराज्याची संकल्पना दिली आणि तेच रामराज्य प्रस्थापित करण्यासाठी मोदीजी प्रयत्न करत आहे असं मत योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केलं.

दरम्यान या सोहळ्यामध्ये इतके पैसे खर्च करून सरकारने जनतेच्या पैशांचा चुराडा केला आहे असं मत बाबरी मशीद अॅक्शन कमिटीच्यावतीने व्यक्त करण्यात आलं .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 18, 2017 10:01 PM IST

ताज्या बातम्या