अयोध्या वाद : सुप्रीम कोर्टाने मध्यस्थांना दिली 15 ऑगस्टपर्यंतची वेळ

अयोध्या वादावर सर्वसंमतीने तोडगा काढण्यासाठी सुप्रीम कोर्टाने मध्यस्थांना दिली 15 ऑगस्टपर्यंतचा वेळ वाढवून दिला आहे.

News18 Lokmat | Updated On: May 10, 2019 10:59 AM IST

अयोध्या वाद :  सुप्रीम कोर्टाने मध्यस्थांना दिली 15 ऑगस्टपर्यंतची वेळ

नवी दिल्ली, 10 मे : अयोध्या वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात झाली आहे. या प्रकरणात नेमण्यात आलेल्या मध्यस्थी समितीचे अध्यक्ष न्या. एफ.एम.आय. खलीफुल्ला आज समितीचा अहवाल सुप्रीम कोर्टात सोपवला. यावेळी अयोध्या वादावर सर्वसंमतीने तोडगा काढण्यासाठी सुप्रीम कोर्टाने मध्यस्थांना दिली 15 ऑगस्टपर्यंतचा वेळ वाढवून दिला आहे.

सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. एस.ए. बोबडे, न्या. डी.वाय. चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. एस. अब्दुल नजीर या पाच न्यायाधीशांच्या उपस्थित सुनावणीला घेण्यात आली आहे.


Loading...


या प्रकरणात सौहार्दपूर्ण समेट होण्याची शक्यता पडताळून पाहण्यासाठी मध्यस्थांची समिती नेमण्यात आली होती. या समितीने 6 मे रोजी आपला अहवाल सर्वोच्च न्यायालयाकडे सुपुर्द केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने 8 मार्चला हे प्रकरण मध्यस्थीसाठी समितीकडे सोपवण्याचा आदेश दिला होता. निवृत्त न्यायाधीश एफ एम कलिफुल्ला यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर, तसेच ज्येष्ठ वकील श्रीराम पांचू हे दोन सदस्य आहेत. याप्रकरणी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठ सुनावणी होत आहे.


'मनसे फॅक्टर'चा मावळमध्ये पार्थ पवारांना होईल का फायदा? पाहा हा SPECIAL REPORT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 10, 2019 10:53 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...