नवी दिल्ली, 6 मार्च : अयोध्या प्रकरणात मध्यस्थाची नेमणूक करण्यासंदर्भातील निर्णय सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला आहे. सुप्रीम कोर्टाच्या 5 सदस्यीय खंडपीठाने सर्व पक्षकारांची बाजू ऐकूण घेतल्यानंतर मध्यस्थाचं नाव सुचवण्यास सांगितलं आहे.
हिंदू महासभेचा याप्रकरणी मध्यस्थ नेमण्यास विरोध आहे. तर मुस्लीम पक्षकारांनी म्हटलं की, 'याबाबतची चर्चा कशी व्हायला हवी हे सुप्रीम कोर्टानेच ठरवावं.'
सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायाधीश बोबडे, न्यायाधीश अशोक भूषण, न्यायाधीश एस नजीर, न्यायाधीश डी वाय चंद्रचूड या खंडपीठापुढे सुनावणी अयोध्या प्रकरणातील ही सुनावणी करण्यात आली आहे.
दरम्यान, 'हे प्रकरण मध्यस्थीसाठी पाठवायचं की नाही, याबाबतचा निर्णय पुढच्या सुनावणीत केला जाईल,' असं सुप्रीम कोर्टाने 26 फेब्रुवारीला म्हटलं होतं.
'दोन्ही बाजूंनी चर्चेद्वारे मार्ग काढण्याबाबत विचार करावा. जर चर्चेची थोडीदेखील शक्यता असले तर त्याबाबत प्रयत्न व्हायला हवा,' अशा सूचना मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षेखालील पाच न्यायाधीशांच्या संविधान पीठाने दिल्या होत्या.
अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्द्यावरून देशात गेल्या अनेक वर्षांपासून मोठा वाद सुरू आहे. त्यामुळे हे प्रकरण वर्षानुवर्ष न्यायालयात आहे. आता हा वाद मिटवण्यासाठी आणि दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकूण सुवर्णमध्य साधण्यासाठी हालचाली सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.
VIDEO: दिल्लीच्या CGO कॅम्पसमध्ये भीषण आग; 25 बंब घटनास्थळी दाखल