Ayodhya : रामजन्माबदद्लचे पुरावे दरोड्यामध्ये नष्ट झाले, सुप्रीम कोर्टात केला दावा

Ayodhya : रामजन्माबदद्लचे पुरावे दरोड्यामध्ये नष्ट झाले, सुप्रीम कोर्टात केला दावा

अयोध्येमधल्या वादग्रस्त जागेप्रकरणी सुप्रीम कोर्टात रोज सुनावणी सुरू आहे. सुप्रीम कोर्टाने अयोध्येमधल्या खटल्याबद्दलचे काही पुरावे मागितले तेव्हा 1982 च्या दरोड्यामध्ये सगळे पुरावे हरवल्याचा दावा निर्मोही आखाड्याने केला.

  • Share this:

नवी दिल्ली, 8 ऑगस्ट :  अयोध्येमधल्या वादग्रस्त जागेप्रकरणी सुप्रीम कोर्टात रोज सुनावणी सुरू आहे. सुप्रीम कोर्टाने अयोध्येमधल्या खटल्याबद्दलचे काही पुरावे मागितले तेव्हा 1982 च्या दरोड्यामध्ये सगळे पुरावे हरवल्याचा दावा निर्मोही आखाड्याने केला. आता आपल्याकडे कोणतंही रेकॉर्ड नाही, असं निर्मोही आखाड्याचे वकील सुशील जैन यांनी सांगितलं. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पाच जणांच्या घटनापीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.

निर्मोही आखाड्याच्या वकिलांनी पुरावे हरवल्याचं सांगितल्यानंतर न्या. रंजन गोगोई यांनी याबद्दल आणखी काही पुरावे सादर करायला सांगितलं. त्यावर सुशील जैन म्हणाले, राम जन्मभूमी ही देवतांची भूमी आहे. हे स्थान हिंदूंचं श्रद्धास्थान आहे. त्यांनी वाल्मिकी रामायणाचाही दाखला दिला. भगवान रामाचा जन्म अयोध्येमध्येच झाला होता याबद्दल वाल्मिकी रामायणात तीन वेळा उल्लेख करण्यात आला आहे, असंही ते म्हणाले.

मध्यस्थांमार्फत तोडगा नाही

राम जन्मभूमीबद्दलच्या या सुनावणीच्या आधी सुप्रीम कोर्टाने यावर तोडगा काढण्यासाठी 3 मध्यस्थांची समिती नेमली होती. पण या मध्यस्थांच्या समितीचा फार काही फायदा झाला नाही. त्यामुळेच जोपर्यंत निकाल येत नाही तोपर्यंत रोज या प्रकरणाची सुनावणी केली जाणार आहे.

या शेतकऱ्याचं मोदींनी केलं कौतुक पण आता केला आत्महत्येचा प्रयत्न

अयोध्येमधल्या या वादग्रस्त जागेवर सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही आखाडा आणि रामलल्ला यांच्यामध्ये वाद सुरू आहे. या प्रकरणी अलाहाबाद हायकोर्टाच्या निर्णयाविरुद्ध 14 याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.या जागेचं सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही आखाडा आणि रामलल्ला यांच्यामध्ये समान वाटप व्हावं, असा निकाल अलाहाबाद हायकोर्टाने दिला होता. त्याला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं आहे.

=============================================================================================

कोल्हा'पूर'मय, पाहा हा ड्रोन VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 8, 2019 08:28 PM IST

ताज्या बातम्या