सुप्रीम कोर्टाच्या 'या' निर्णयाने अयोध्येतील राम मंदिराचा मार्ग मोकळा

सुप्रीम कोर्टाच्या 'या' निर्णयाने अयोध्येतील राम मंदिराचा मार्ग मोकळा

या प्रकरणी सुप्रीम कोर्ट कुठला निर्णय देते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. सुप्रीम कोर्टाने वेगळा निर्णय दिला असता तर हे प्रकरण आणखी रखडलं गेलं असतं.

  • Share this:

नवी दिल्ली 12 डिसेंबर : अयोध्येतल्या राम मंदिर प्रकरणावर सुप्रीम कोर्टाने आज दुसरा महत्त्वाचा निर्णय दिलाय. या निर्णयामुळे राम मंदिराचा मार्ग मोकळा झालाय. 9 नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयात वादग्रस्त 2.77 एकर जागा रामजन्मभूमी न्यासाला देण्याचा निर्णय घेतला होता. तर सुन्नी वक्फ बोर्डाला मशिद बांधण्यासाठी चांगल्या ठिकाणी 5 एकर जागा देण्याचा आदेश दिला होता. या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात तब्बल 18 पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यामुळे या प्रकरणी सुप्रीम कोर्ट कुठला निर्णय देते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. सुप्रीम कोर्टाने वेगळा निर्णय दिला असता तर हे प्रकरण आणखी रखडलं गेलं असतं. पण आजच्या निर्णयामुळे मंदिराचा मार्ग मोकळा झालाय. दाखल झालेल्या सर्व 18 पुनर्विचाराच्या याचिकेवर सरन्यायाधिशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठात आज सुनावणी झाली आणि त्यात सर्व याचिका फेटाळण्यात आल्या आहेत. या खंडपीठात (CJI) शरद बोबडे, जस्टिस धनंजय चंद्रचूड़, जस्टिस अशोक भूषण, जस्टिस एस अब्दुल नजीर आणि जस्टिस संजीव खन्ना यांचा समावेश होता. सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी त्यात करण्यात आली होती.

अजित पवारांना एकाच दिवसात दुसरा धक्का, जाणून घ्या काय झालं!

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणी 9 नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टाने  आपला ऐतिहासिक निकाल दिला होता. अयोध्येतील वादग्रस्त जागा रामलल्लाचीच असून काही अटी शर्तीच्या आधारावर ती हिंदुंना मिळणार आहे. मुस्लिमांना मशीद बांधण्यासाठी पर्यायी जागा मिळणार असल्याचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी दिला आहे. रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने आपला निकाल दिला आहे. आतील भाग अद्यापही वादग्रस्त असून ती जागा ट्रस्टच्या ताब्यात देण्यात येईल, यासाठी केंद्र सरकारने आगामी तीन महिन्यात ट्रस्ट स्थापन करावे, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. सुन्नी वक्फ बोर्डाने सुप्रीम कोर्टाच्या निकालाचे स्वागत केले आहे.

अखेर ठाकरे सरकारचं खातेवाटप; जाणून घ्या, कोणत्या पक्षाकडे कोणते खाते?

दरम्यान, 6 ऑगस्टपासून 16 ऑक्टोबरपर्यंत 40 दिवस हिंदू आणि मुस्लिम पक्षकाराची बाजू ऐकल्यानंतर कोर्टाने हा निर्णय राखून ठेवला होता. दरम्यान, सरन्यायाधीश गोगोई हे 17 नोव्हेंबरला निवृत्त होत असून त्याआधी त्यांनी या प्रकरणाचा निकाल दिला आहे. यानिकालाच्या संपूर्ण मुंबईत जमावबंदीचे (144 कलम) आदेश देण्यात आले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 12, 2019 07:38 PM IST

ताज्या बातम्या