अयोध्या: मंदिराच्या संपत्तीसाठी 10 'राम' पोहोचले कोर्टात!

अयोध्या: मंदिराच्या संपत्तीसाठी 10 'राम' पोहोचले कोर्टात!

अयोध्येतील एका मंदिराच्या संपत्तीसाठी एक दोन नव्हे तर 10 राम न्यायालयात पोहोचले आहेत.

  • Share this:

अयोध्या, 19 नोव्हेंबर: अनेक दशकांपासून सुरु असलेला अयोध्येतील राम मंदिराप्रकरणी सर्वोच्च न्यायालया(Supreme Court) ने अंतिम निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने वादग्रस्त जागेवर राम मंदिर (Temple)बांधण्यास पवानगी दिल्यामुळे आता हा प्रश्न निकाली निघाला आहे. पण अयोध्येतील एका मंदिराच्या संपत्तीसाठी एक दोन नव्हे तर 10 राम न्यायालयात पोहोचले आहेत. या वादासंदर्भातील माहिती खुद्ध अयोध्येचे जिल्हाधिकारी अनुज झा (DM Anuj Jha) यांनी सोशल मीडियावरून दिली आहे. झा यांची ही पोस्ट आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अयोध्ये(Ayodhya)चे जिल्हाधिकारी अनुज झा यांनी एका मंदिराच्या संपत्तीच्या वादासंदर्भात ट्वीट केले आहे. मंदिराच्या संपत्ती संदर्भात 10 राम न्यायालयीन लढाई लढत आहेत. या प्रकरणात 12 जण आहे त्यापैकी 10 जणांची नावे रामाशी संबंधित आहेत. झा यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, अयोध्या खरोखर रामाची नगरी आहे. येथील लोकांचे नाव भगवान रामा शी जोडलेले असते. झा यांनी या प्रकरणाशी संबंधित एक कागदपत्रच ट्वीटसोबत जोडला आहे. या कागदावर संबंधित लोकांची नावे आहेत. यातील 10 जणांच्या नावात राम हा शब्द आहे.

झा यांनी ट्वीटवर दिलेल्या माहितीनुसार अयोध्येतील रजबंश पंचायतमधील रायगंज मंदिराच्या संपत्तीचा वाद त्यांच्याकडे आला आहे. या प्रकरणात 12 जणांनी संपत्तीवर दावा केला आहे. या 12 पैकी 10 जणांची नावात राम हा शब्द आहे. राम कुमार, राम केवल, शिव कुमार, रमाकांत, सुधाकर, श्यामलाल, सीताराम, सियाराम, अनंतराम, धनीराम, रामचंद्र, श्रीमती राजमणी अशी त्यांची नावे आहेत.

राम मंदिरासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर अयोध्येतील कायदा सुव्यवस्था बिघडली नाही. यासाठी अनुज झा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक होत आहे. झा हे सोशल मीडियावर सक्रीय आहेत आणि त्यांचे ट्वीट अयोध्येत लोकप्रिय होतात. याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात झा शहाजहापूर येथून अयोध्यत जिल्हाधिकारी म्हणून आले. अयोध्येत आल्यानंतर अनेक आव्हानांना त्यांना तोड द्यावे लागले. सर्वोच्च न्यायालयाचा राम मंदिराशिवाय कार्तिक पौर्णिमा स्नान, पंचक्रोशी 14 कोसी परिक्रमा आदी कार्यक्रम झा यांनी कोणत्याही अडचणीशिवाय पार पाडले होते. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर देखील झा यांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे. राम मंदिर बाबरी मशिद प्रकरणाचा उल्लेख जेव्हा केला जातो तेव्हा झा यांचे नाव देखील घेतले जाते.

Published by: Akshay Shitole
First published: November 19, 2019, 1:37 PM IST
Tags: Ayodhya

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading