अयोध्या 28 जुलै: अयोध्येत ऐतिहासिक राम मंदिराच्या (Ram Mandir) भूमिपूजनाला आता फक्त काही दिवस राहिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर अनेक गोष्टींची चर्चा सुरु झाली आहे. राम मंदिराचं गर्भगृह असलेल्या जागेवर 200 फुटांखाली ‘टाइम कॅप्सुल’मध्ये राम मंदिराचा इतिहास ठेवला जाणार असल्याचं राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे (Ram Janmbhumi Teerth Kshetra Trust) सदस्य कामेश्वर चौपाल यांनी म्हटलं होत. त्यानंतर जोरदार चर्चा सुरु झाली होती. मात्र ट्रस्टचे महासचिव आणि प्रवक्ते चंपत राय यांनी मात्र अशी कुठलीही कॅप्सुल ठेवली जाणार नसल्याचं म्हटलं आहे.
चंपत राय म्हणाले, अशी कुठलीही कॅप्सुल ठेवली जाणार नाही. तुम्ही ट्रस्टने जे अधिकृत निवेदन दिलं त्यावरच विश्वास ठेवला पाहिजे. त्यामुळे ट्रस्टच्या सदस्यांमध्येच ताळमेळ नसल्याचं पुढे आलं आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भूमिपूजनाच्या वेळेस एक ताम्रपत्र ठेवलं जाणार असून त्यावर मंदिराचा इतिहास आणि पायाभरणीची तारीख लिहून ठेवली जाणार आहे. ते किती खोलवर असेल याची माहिती अद्याप पुढे आलेली नाही. मात्र जमिनीखाली 100 फुटांवर ते ताम्रपत्र ठेवलं जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
या भूमिपूजन कार्यक्रमाची सुरुवात 3 ऑगस्टपासूनच होणार आहे. काशीतले विद्वान यासाठी पौरोहित्य करणार आहेत.
असा असेल कार्यक्रम
3 ऑगस्ट – गणेश पूजा
4 ऑगस्ट – रामार्चन
5 ऑगस्ट – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन. 12.15 मिनिटांनी पंतप्रधान राम मंदिराच्या बांधकामाची पहिली वीट लावणार आहेत.
COVID-19: औषध नसतांनाही तब्बल 1 कोटी लोकांनी केली ‘कोरोना’वर मात
9 नोव्हेंबर 2019 ला सुप्रीम कोर्टाने अयोध्येचा निकाल दिल्यानंतर राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टची निर्मिती करण्यात आली होती. तेव्हापासून तयारीला सुरुवात झाली आहे. 25 मार्च रोजी गर्भगृहावर असलेल्या मूर्तींना तात्पुरत्या मंदिरात स्थापित करण्यात आलं होतं.
त्यानंतर मुळ गर्भगृहाची जागा समतल करण्यात आली होती. भूमिपूजनाचा कार्यक्रम निट नेटका व्हावा यासाठी उत्तर प्रदेश सरकार कामाला लागलं आहे. राम मंदिराच्या चळवळीत ज्या नेत्यांनी सहभाग घेतला त्या सर्वांना या भूमिपूजन कार्यक्रमासाठी बोलावण्यात आलं आहे.
सलग दुसऱ्या दिवशी देशाचा रिकव्हरी रेट वाढला! तर 24 तासांत 47 हजार रुग्णांची नोंद
161 फुटांचे हे मंदिर असणार आहे आणि त्याला पाच घुमट असतील. गेल्या काही दशकांपासून मंदिरासाठी लागणाऱ्या खांबांचं काम कारसेवकपूरम इथं सुरु होतं. त्याचाच वापर आता केला जाणार आहे. या बांधकामात देशातल्या लोकांनाही सहभागी करून घेतलं जाणार आहे.
कोरोनाची परिस्थिती थोडी निवळली की त्यासाठी देशभर व्यापक कार्यक्रम राबविण्याची योजना तयार करण्यात आली आहे.