पुन्हा अवॉर्ड वापसी सुरू? उर्दू कवी परत करणार पद्मश्री पुरस्कार; महाराष्ट्राबद्दल काय म्हणाले पाहा

पुन्हा अवॉर्ड वापसी सुरू? उर्दू कवी परत करणार पद्मश्री पुरस्कार; महाराष्ट्राबद्दल काय म्हणाले पाहा

कुणाला सकाळी 7 वाजता शपथ दिली जाते, रात्रीत सरकार स्थापन केलं जातं. देशभर भीतीचं वातावरण आहे, असं म्हणत उर्दू कवी हुसेन यांनी पद्मश्री परत करणार असं सांगितलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 डिसेंबर : काही वर्षांपूर्वी आलेलं अवॉर्ड वापसीचं लोण पुन्हा येण्याची चिन्हं आहेत. देशात भीतीचं वातावरण आहे. लोकशाही धोक्यात आहे, असं सांगत उर्दू कवी मुज्तबा हुसेन यांनी पद्मश्री पुरस्कार परत करण्याची घोषणा केली. आपण भारत सरकारतर्फे मिळालेला पुरस्कार परत देऊ इच्छितो कारण आता या देशात कुठलीही यंत्रणा सक्षम राहिलेली नाही. लोकशाही धोक्यात आहे. कुणाला सकाळी 7 वाजता शपथ दिली जाते, रात्रीत सरकार स्थापन केलं जातं. देशभर भीतीचं वातावरण आहे, असं हुसेन यांनी म्हटलं आहे.

हिंदी लेखक उदय प्रकाश यांनी सप्टेंबर 2015 मध्ये पुरस्कार परत करून तत्कालीन मोदी सरकारचा निषेध केला होता. एम. एम. कलबुर्गी, नरेंद्र दाभोलकर अशांच्या भर दिवसा हत्या होतात आणि त्यांचे मारेकरी अजूनही पकडले जात नाहीत. दुसरीकडे गोमांसावरून गदारोळ उठतो आणि मॉब लिंचंग होतं याचाही निषेध करण्यात आला.

कवी अशोक वाजपेयी, नयनतारा सेहगल आदींनीही उदय प्रकाश यांच्यानंतर पुरस्कार परत केला.

आता मुजतबा हुसेन यांनी देशात भीतीचं वातावरण आहे सांगताना महाराष्ट्राचं नाव न घेता इथल्या राजकीय उलथापालथीचा उल्लेख केला आहे. इथे अपरात्री सरकार स्थापन होतं आणि सकाळी सात वाजता शपथ दिली जाते, असं त्यांनी म्हटलं आहे.

अवॉर्ड वापसी गँगने राजकीय उद्देशाने सरकारची प्रतिमा मलीन केली असल्याचा आरोप भाजपने 2015 च्या चळवळीवर केला होता.

-------------------------------

अन्य बातम्या

हैदराबाद Encounter: खळबळजनक खुलासा, आरोपींनी आधी 9 महिलांना बलात्कार करून जाळलं

निर्भयाच्या गुन्हेगारांना वाचवण्यासाठी वकिलाने दिला गांधी हत्येचा दाखला

'शरद पवार हे अफझल खान', देवेंद्र फडणवीसांनी 'तो' सामना वाचून दाखवताच मोठा गदारोळ

जाणून घ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणारे दिल्ली पोलीस लाल टी-शर्टमध्ये का?

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: December 18, 2019, 2:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading